28 C
Mumbai
Monday, September 7, 2026
घरविशेषपहिल्याच दिवशी ‘टॉक्सिक’चा थिएटरमध्ये धुमाकूळ; ऍक्शनसह इमोशनची भुरळ

पहिल्याच दिवशी ‘टॉक्सिक’चा थिएटरमध्ये धुमाकूळ; ऍक्शनसह इमोशनची भुरळ

प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद

Google News Follow

Related

अभिनेता यश आणि कियारा अडवाणी यांचा ‘टॉक्सिक : ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ हा चित्रपट आजपासून (२६ ऑगस्ट) देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाची मोठी चर्चा होती. आता पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांकडून चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळत असून, विशेषतः ऍक्शन सीन्स आणि यशच्या अभिनयाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

दिग्दर्शक गीतू मोहनदास यांनी ‘टॉक्सिक’मध्ये ऍक्शनसोबतच गँगस्टर विश्व, प्रेम, कुटुंब, नाती आणि भावनिक संघर्ष यांची सांगड घातली आहे. त्यामुळे हा चित्रपट केवळ ऍक्शनपट न राहता अनेक भावनिक पदर असलेला अनुभव ठरतो. चित्रपटात यश राया आणि टिकट या दोन भूमिकांमध्ये दिसतो. राया हा गँगस्टर विश्वातील महत्त्वाचा चेहरा आहे, तर टिकटच्या व्यक्तिरेखेतून कथेला वेगळी भावनिक बाजू मिळते. या दोन्ही व्यक्तिरेखांमधील फरक यशने प्रभावीपणे साकारल्याचे समीक्षकांनी नमूद केले आहे.

नयनतारा, कियारा अडवाणी, हुमा कुरैशी, रुक्मिणी वसंत आणि तारा सुतारिया यांच्याही अभिनयाचे कौतुक होत आहे. कियारा अडवाणीच्या व्यक्तिरेखेत भावनिकता आणि संवेदनशीलता प्रभावीपणे दिसून येते, तर हुमा कुरैशी यांनी एलिझाबेथच्या भूमिकेत आपली छाप पाडली आहे. रुक्मिणी वसंत यांची मेलिसाची भूमिका चित्रपटातील ‘सरप्राइज पॅकेज’ ठरत असल्याचेही म्हटले जात आहे.

चित्रपटाचा पहिला भाग ड्रामा, नाती आणि गँगस्टर विश्वावर केंद्रित आहे. इंटरव्हलच्या आधी कथा मोठ्या वळणावर पोहोचते. त्यानंतर दुसऱ्या भागात ऍक्शनचा स्तर आणखी वाढतो. ॲक्शन दृश्ये अधिक वेगवान आणि तीव्र होत असतानाही चित्रपटातील प्रेम, कुटुंब आणि नात्यांचा भावनिक धागा कायम ठेवण्यात आला आहे. ‘टॉक्सिक’ची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे चित्रपट प्रेक्षकांना प्रत्येक गोष्ट थेट समजावून सांगत नाही. कथा पुढे जात असताना अनेक घटनांचा अर्थ प्रेक्षकांना स्वतः जोडावा लागतो. क्लायमॅक्समधील अनपेक्षित वळण चित्रपटाचा प्रभाव आणखी वाढवते, असे समीक्षकांचे मत आहे.

हे ही वाचा:

भारत-फ्रान्स मिळून बनवणार ‘अरावली’ हेलिकॉप्टर इंजिन

बाब-अल-मंदेबवर भारतीय नौदलाची नजर; दोन जहाजांचा सुरक्षित प्रवास

मुदत संपलेले मासे, अस्वच्छ किचन; बंगळुरूतील हाय-प्रोफाइल क्लबमधील प्रकार

जगभरातील अमेरिकन व्हिसा अपॉइंटमेंट्सला स्थगिती

सुमारे ३ तास १४ मिनिटांच्या या चित्रपटात भव्य दृश्यरचना, मोठ्या प्रमाणातील ऍक्शन आणि भावनिक कथानक पाहायला मिळते. यशचा दमदार स्क्रीन प्रेझेन्स आणि गीतू मोहनदास यांची वेगळी कथा सांगण्याची शैली चित्रपटाची प्रमुख वैशिष्ट्ये ठरली आहेत. एकूणच, गँगस्टर ड्रामा, प्रेम, कुटुंब, भावनिक संघर्ष आणि भव्य ऍक्शन यांचा मेळ असलेला ‘टॉक्सिक’ मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरत असल्याचे पहिल्या दिवसाच्या प्रतिक्रियांवरून दिसत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
330,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा