28.9 C
Mumbai
Wednesday, November 4, 2026
घरविशेषअभिनेत्री उर्मिला कोठारेंच्या कारने दोघांना उडवले, एकाचा मृत्यू 

अभिनेत्री उर्मिला कोठारेंच्या कारने दोघांना उडवले, एकाचा मृत्यू 

समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Google News Follow

लोकप्रिय मराठी अभिनेत्री आणि महेश कोठारे यांची सून उर्मिला कोठारे यांच्या गाडीचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. मुंबईतील कांदिवली येथे ही घटना घडली. अभिनेत्रीच्या कारने दोघांना उडवले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात अभिनेत्री आणि तिचा कार चालकही जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली. अभिनेत्री उर्मिला काल (२७ डिसेंबर) रात्री तिचे शूटिंग संपवून कारमधून घरी जात होती. त्याचवेळी गाडीचा वेग जास्त असल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि रस्त्याला कडेला मेट्रोचे काम करणाऱ्या दोन मजुरांना उडवले.

यावेळी एका मजुराचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसरा मजूर जखमी झाला. अपघातात कारचालकासह अभिनेत्री उर्मिला कोठारे या देखील जखमी झाली आहेत. या प्रकरणी समतानगर पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

हे ही वाचा : 

आपची महिला योजना : चौकशीचे निर्देश

फ्लॉवर नही फायर है नितीश रेड्डी!

बीड सरपंच देशमुखांच्या न्यायासाठी मूक मोर्चा!

पोलीस अधिकारी मोहम्मद मोहसीन खानचा पीएचडी कार्यक्रम रद्द

 

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा