मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि न्यायासाठी आज (२८ डिसेंबर) बीडमध्ये मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मूक मोर्चात पुरुष, महिला, तरुणांसह जेष्ठ नागरिकही सहभागी झाले. यावेळी सर्व संघटना आणि सर्वपक्षीय नेते रस्त्यावर उतरले. सरपंच संतोष देशमुख यांचे संपूर्ण कुटुंब मूक मोर्चेत सहभागी झाले होते. देशमुखांच्या हत्येतील सर्व आरोपींवर कारवाई करत अटकेची मागणी आंदोलकांनी केली. धनंजय मुंडे यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी आंदोलकांनी केली. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, छत्रपती संभाजी राजे भोसले, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनावणे, प्रकाश सोळंके, ज्योती मेटे आदी नेते मोर्चेमध्ये उपस्थित होते.
९ डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांकडून तपास सुरु आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आरोपींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. न्यायाच्या मागणीसाठी आंदोलन आज रस्त्यावर उतरले. या मूक मोर्चामध्ये हजारो आंदोलक काळ्या फिती लावून, काळे झेंडे हातात घेऊन सहभागी होते.
आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली. तसेच वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही असा सवालही आंदोलकांनी उपस्थित केला. जर सरकारकडून लवकर न्याय मिळाला नाहीतर पुन्हा आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी म्हटले. मोर्चेमध्ये सहभागी असलेल्या सर्व राजकीय नेत्यांनी भाषण देत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली.
हे ही वाचा :
महाराष्ट्रात अवैध घुसखोरीविरोधात कारवाई सुरू, १६ बांगलादेशींना अटक!
पोलीस अधिकारी मोहम्मद मोहसीन खानचा पीएचडी कार्यक्रम रद्द
१७ कोटी रुपयांचे ड्रग्स पोटात ठेवून तस्करी करणाऱ्या दोन परदेशी नागरिकांना अटक!
मनालीत अडकलेल्या १० हजार पर्यटकांची सुटका