23 C
Mumbai
Sunday, January 25, 2026
घरविशेषअमेरिकेचे उपाध्यक्ष वेन्स यांचे आहे भारताशी असे 'नाते'

अमेरिकेचे उपाध्यक्ष वेन्स यांचे आहे भारताशी असे ‘नाते’

जेडी वेन्स आणि उषा वेन्स यांचा फोटो व्हायरल

Google News Follow

Related

अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाने ओहायोचे सिनेटर जेडी वेन्स यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवल्यानंतर त्यांची पत्नी उषा चिलुकुरी वेन्स या भारतीय-अमेरिकन नागरिकही प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा नुकताच शपथ सोहळा पार पडला. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर उपाध्यक्ष म्हणून जेडी वेन्स यांनी शपथ घेतली. विशेष म्हणजे जेडी वेन्स यांचे भारताची जवळचा संबंध आहे. कारण जेडी वेन्स यांच्या पत्नी उषा चिलुकुरी वेन्स या भारतीय वंशाच्या आहेत.

जेडी वेन्स आणि उषा वेन्स यांचा शपथसोहळ्या दरम्यानचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. जेडी वेन्स शपथ घेत असताना उषा वेन्स त्यांच्याकडे अभिमानाने आणि कौतुकाने पाहत असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. उषा वेन्स यांनी डाव्या हातावर मुलीला धरले आहे आणि उजव्या हातावर बायबल पकडले आहे, ज्यावर जेडी वेन्स हात ठेवून शपथ घेत आहेत. यावेळी उषा वेन्स यांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावरील हास्यावरून स्पष्ट होत होता. सोशल मिडीयावर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून अनेकांनी लाईक्स आणि कॉमेंट केल्या आहेत.

हे ही वाचा : 

९ नवे जिल्हे रद्द केल्याबद्दल राजस्थानमध्ये आंदोलन

दावोसमधून पहिल्याचं दिवशी सहा लाख कोटींहून अधिकची विक्रमी गुंतवणूक

केरळचे पिनराई सरकार अडचणीत; पीपीई किट खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा!

बीड हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार घोषित!

उषा चिलुकुरी वेन्स यांचे वडील आंध्र प्रदेशचे आहेत. त्यांचे आईवडील भारतातून अमेरिकेत पोहोचले आणि पुढे तिथेच स्थायिक झाले. उषा वेन्स या सॅन दिएगो मध्येच लहानाच्या मोठ्या झाल्या. कॉलेजनंतर येल विद्यापीठातून त्यांनी पदवी प्राप्त केली. त्यांनी यूएस सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश जॉन जी. रॉबर्ट्स ज्युनियर तसेच न्यायाधीश ब्रेट कावानॉ आणि न्यायाधीश अमूल थापर यांच्यासाठी लिपिक म्हणून काम केले आहे. सध्या त्या वकिली करत आहेत.

जेडी वेन्स यांच्या आतापर्यंतच्या संपूर्ण प्रवासात त्यांना त्यांची पत्नी उषा चिलुकुरी वेन्स यांची साथ मिळाली आहे. २०१३ मध्ये ‘येल विद्यापीठा’त या दोघांची भेट झाली. त्यानंतर २०१४ साली दोघांनी लग्न केले. दोघांनी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे लग्न केले. उषा आणि जेडी यांना इव्हान, विवेक अशी दोन मुले आणि मिराबेल ही एक मुलगी आहे.

दरम्यान, ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे होतेच पण त्यांची पत्नी ही भारतातील उद्योगपती नारायण मूर्ती यांची कन्या होती. त्यामुळे तेही भारताचे ‘जावई’ होते. आता अमेरिकन उपराष्ट्राध्यक्ष वेन्स एकप्रकारे भारताचे ‘जावई’ ठरले आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा