पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये हिंसाचार थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. मुर्शिदाबादच्या धुलियानमध्ये आज (१६ एप्रिल) सकाळी पुन्हा एकदा जाळपोळीची घटना घडली. सकाळी ६ वाजता धुलियान परिसरात नगरपालिकेजवळ असलेल्या एका सौंदर्यप्रसाधनांच्या दुकानाला आग लावण्यात आल्याचे वृत्त आहे.
वक्फ सुधारणा कायद्याच्या निषेधार्थ झालेल्या हिसाचारात मोठ्या प्रमाणात नागरिकांचे, सरकारचे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. सुरक्षा दल सर्व ठिकाणी नजर ठेवून आहेत मात्र, तरीही आज धुलियानामध्ये सौंदर्यप्रसाधनांच्या दुकानाला आग लागली. या दुकानात बांगड्या आणि सौंदर्यप्रसाधने विकली जात होती. या घटनेनंतर परिसरात केंद्रीय दल तैनात करण्यात आले आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस याचा तपास करत आहेत. दुकानाचे मालक सौरव साहा म्हणतात की हे कोणी केले याची त्यांना कल्पना नाही. दरम्यान, हिंसाचाराच्या घटनेनंतर दुकानदार आपली दुकाने उघडण्यास घाबरत आहेत. वक्फ सुधारणा कायद्याविरोधात शुक्रवार आणि शनिवारी सुती, धुलियान आणि जांगीपूरसह जिल्ह्यातील अनेक भागात हिंसक निदर्शने झाली. यानंतर जांगीपूर, धुलियान, सुती आणि शमशेरगंज येथे बीएसएफ, सीआरपीएफ, राज्य पोलिस आणि आरएएफचे जवान मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत.
हे ही वाचा :
ममता बॅनर्जी यांची इमामांशी भेट, काय घडले भेटीत ?
गुरुग्राम मेदांता रुग्णालय: व्हेंटिलेटरवर असताना लैंगिक अत्याचाराचा एअर होस्टेसकडून आरोप
कमर्शियल वाहनांची विक्री १० लाख युनिट्सपर्यंत पोहचेल
भारत आमच्या आवडत्या इक्विटी बाजारांपैकी एक
दरम्यान, या हिंसाचाराच्या तपासात बांगलादेशी बदमाशांचा सहभाग असल्याची नुकतीच बातमी समोर आली होती. तसेच ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकार घुसखोरांवर लक्ष ठेवण्यात अपयशी ठरले, असेही तपास यंत्रणेच्या तपासात आढळून आले होते.