33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरविशेष२२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा असल्याने आम्ही येऊ शकत नाही, कृपया कारवाई करू...

२२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा असल्याने आम्ही येऊ शकत नाही, कृपया कारवाई करू नये!

वकिलांचे न्यायाधीशांना पत्र

Google News Follow

Related

अयोध्येत २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे.सोहळ्याच्या विधीची तयारी आज १६ जानेवारीपासून तयारी करण्यात आली आहे.देशभरात आनंदाचे वातावरण आहे.अयोध्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातून लोक येत आहेत.दरम्यान, दिल्ली कोर्टात वकील हजर न राहण्याबाबत बार असोसिएशनकडून विशेष विनंती करण्यात आली आहे.नवी दिल्ली बार असोसिएशनने पटियाला हाऊस कोर्टाच्या न्यायाधीशांना पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, जर वकील त्या दिवशी सुनावणीला हजर राहू शकले नाही, तर त्याच्या अनुपस्थितीवर कारवाई करू नये.

नवी दिल्ली बार असोसिएशनचे मानद सचिव ओशन शर्मा यांनी पटियाला हाऊस न्यायालयाच्या प्रधान जिल्हा आणि सत्र नायाधीशांना विनंती करणारे पत्र लिहिले आहे.पत्रात लिहिले आहे की, २२ जानेवारी रोजी प्रभू श्री राम मंदिरातील अभिषेक सोहळा आहे.यावेळी वकील न्यायालयात अनुपस्थित राहिल्यास कोणताही प्रतिकूल आदेश जारी करू नये, असे विनंती पत्र वकिलांकडून लिहिण्यात आले आहे.

हे ही वाचा:

इस्रायलने मारले हमासचे ९ हजार दहशतवादी

विमानतळावरील व्हायरल व्हिडीओनंतर नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरोने इंडिगोकडून मागविले उत्तर

भारतीय समाजाचा मानबिंदू नष्ट करण्याचे अथक प्रयत्न

अटल सेतू हा ‘पिकनिक स्पॉट नाही’!

पत्रात पुढे म्हटले आहे की, वकील किंवा याचिकाकर्ते प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहण्यासाठी अयोध्येला जाऊ शकतात. अशा स्थितीत या दोघांनाही अनेक खटल्यांच्या सुनावणीत सहभागी होणे थोडे कठीण होऊ शकते, त्यामुळे न्यायालयात वकिलांची अनुपस्थिती राहिल्यास कारवाई करू नये, असे पत्रात लिहिले आहे.

दरम्यान, २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाबाबत देशभरात उत्सवाचे वातावरण आहे. कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून सर्वांनाच या ऐतिहासिक दिवसाचे साक्षीदार व्हायचे आहे.२२ जानेवारीला राजदूत आणि संसद सदस्यांसह ५५ देशांच्या सुमारे १००प्रमुखांना अयोध्येत आमंत्रित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. विश्व हिंदू फाउंडेशनचे संस्थापक आणि जागतिक अध्यक्ष स्वामी विज्ञानानंद म्हणतात की, आम्ही कोरियन राणीलाही आमंत्रित केले आहे, जी भगवान श्री रामचे वंशज असल्याचा दावा करतात. २२ तारखेला अनेक देशांचे पाहुणे अयोध्येत येणार आहेत. या देशांमध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, बेलारूस, बोत्सवाना, कॅनडा, कोलंबिया, डेन्मार्क, डॉमिनिका, काँगो या देशांची नावे समाविष्ट आहेत.

 

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा