30 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
घरदेश दुनियाइस्रायलने मारले हमासचे ९ हजार दहशतवादी

इस्रायलने मारले हमासचे ९ हजार दहशतवादी

दहशतवाद्यांनी डागलेल्या क्षेपणास्त्रांपैकी इस्रायलवर नऊ हजार पोहोचली

Google News Follow

Related

इस्रायल आणि हमासमधील युद्धाला १०० दिवस उलटले असून यातआतापर्यंत दोन्ही बाजूंकडील सुमारे २५ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. आता इस्रायलच्या लष्कराने सोमवारी नवी आकडेवारी जाहीर केली आहे. इस्रायलच्या लष्कराने केलेल्या दाव्यानुसार, त्यांनी ७ ऑक्टोबर ते ९ जानेवारीदरम्यान सुमारे नऊ हजार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. इस्रायली लष्कराने ब्रिगेडस्तरावरील पाच कमांडरांपैकी दोघांना ठार केले आहे. तसेच, त्यांनी हमासच्या उपप्रमुखाला लेबेनॉनमध्ये मारले. तसेच, बटालियन स्तरावरील १९ कमांडर आणि ५० कंपनी कमांडरनाही त्यांनी ठार केले आहे.

 

हमासची नऊ हजार क्षेपणास्त्रे इस्रायलमध्ये

इस्रायलने सांगितले की, त्यांनी किनारपट्टीच्या भागात सुमारे ३० हजार सैनिकांवर हल्ला केला आणि २३०० दहशतवाद्यांना लक्ष्य केले. हमासच्या दहशतवाद्यांनी डागलेल्या क्षेपणास्त्रांपैकी इस्रायलवर नऊ हजार पोहोचली. बाकी अन्य ठिकाणी कोसळली. इस्रायलने युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत सिरिया आणि लेबेनॉनमध्ये सुमारे ७५० हवाईहल्ले केले. तर सिरियातून ३० आणि लेबेनॉनवरून दोन हजार रॉकेट आणि क्षेपणास्त्रे इस्रायलवर डागण्यात आली.

हे ही वाचा:

शाही इदगाह मशिदीच्या जागेचे सर्वेक्षण करण्यासाठी कमिशनर नेमण्याच्या निर्णयाला स्थगिती

अटल सेतू हा ‘पिकनिक स्पॉट नाही’!

दररोज १८ तास काम करून घडवली रामाची मूर्ती

अयोध्येने उघडला ‘गीता प्रेस’साठी नवा अध्याय!

 

हमासने ५२२ इस्रायली सैनिकांना जिवे मारले

इस्रायलच्या सुरक्षा दलाने दिलेल्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबरपासून ते आतापर्यंत इस्रायलचे ५२२ सैनिक मारले गेले आहेत. आतापर्यंत इस्रायलचे अडीच हजारांहून अधिक सैनिक जखमी झाले आहेत. अडीच हजारांपैकी ३८८ सैनिक जबर जखमी आहेत. त्यातील ६७२ किरकोळ जखमी आहेत.

कॉलेजांत छापेसत्र

इस्रायलच्या सुरक्षा दलाने सोमवारी यहुदिया आणि सामरियाच्या परिसरात छापे टाकले, त्यात १७ संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. त्यात हमासच्या विद्यार्थी संघटनेशी संबंधित नऊजण आहेत. लष्कराने ७ ऑक्टोबरपासून या परिसरातून २६०० दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. यातील १३००हून अधिक जण हमासशी संबंधित आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा