26 C
Mumbai
Monday, February 26, 2024
घरविशेषभारतीय समाजाचा मानबिंदू नष्ट करण्याचे अथक प्रयत्न

भारतीय समाजाचा मानबिंदू नष्ट करण्याचे अथक प्रयत्न

बाबर ते औरंगजेबापर्यंतच्या मुघल राज्यकर्त्यांनी रामजन्मभूमी नष्ट करण्याचे प्रयत्न वारंवार केले

Google News Follow

Related

सुवर्णक्षणांचे भाग्यविधाते !

 

सकल हिंदु समाज ज्या क्षणाची ५०० वर्षांपासून आतुरतेने वाट पाहत होता, तो क्षण आता समीप आला आहे. मोक्षभूमी अयोध्येत जगत्पालक, भक्तवत्सल, मर्यादापुरुषोत्तम,करुणानिधान श्रीरामाच्या भव्य मंदिराचे उदघाटन होणार आहे आणि आपण या ,”एको अहं, द्वितीयो नास्ति, न भूतो न भविष्यति” अश्या अनुपम क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार होणार आहोत !

आपल्याला माहीत आहे की भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली आणि अनेक वर्षे आपल्यावर परकीय सत्ता होती.इंग्रज येण्या आधी काही शतके आपल्या भारतावर मुघलांचे राज्य होते. मुघल हे मुस्लिम शासक असल्याने त्यांनी अनेक ठिकाणची मंदिरे उध्वस्त करून त्या ठिकाणी मशीदी बांधल्या होत्या. त्यातलीच एक बाबरी मशीद!

 

सन १५२८ ते सन २०१९ या काळात एकही वर्ष असे सापडणार नाही की ज्यावेळेला हा संघर्ष अस्तित्वात नव्हता. हा केवळ धार्मिक संघर्ष कधीच नव्हता. त्याला प्रारंभापासून राजकीय बाजू होती. ‘राम हा भारताचा धार्मिक व राजकीय मानबिंदू आहे त्याचप्रमाणे हिंदू समाजाला एकत्र बांधून ठेवण्याची ताकद असलेले सूत्र देखील आहे’ हे वास्तव सर्व धर्मांध, जिहादी मुस्लीम आक्रमकांना माहित होते.

अकराव्या शतकातल्या अल बेरुनीपासून विसाव्या शतकातल्या महंमद अलामा इक्बालपर्यंत अनेक मुस्लीम लेखकांनी ते नोंदवून ठेवले आहे. ‘भारतीय समाजाचा हा मानबिंदू नष्ट केल्याशिवाय आपले राजकीय वर्चस्व खऱ्या अर्थाने प्रस्थापित होणार नाही’ ह्या मानसिकतेतून बाबर ते औरंगजेबापर्यंतच्या मुघल राज्यकर्त्यांनी रामजन्मभूमी नष्ट करण्याचे प्रयत्न वारंवार केले. त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भारतीय समाजाने सतत कडवा संघर्ष केला आणि रामजन्मभूमी नष्ट होऊ दिली नाही किंवा तिच्यावरचा ताबाही सोडला नाही. प्राणप्रिय अयोध्या कधीही पराजित झाली नाही.

आणि शरयू लाल झाली…

ग्रीकांनी राममंदिर पाडले हजारो वर्षांनंतर रामजन्मभूमीवर झालेले हे पहिले आक्रमण होते. त्यानंतर काही वर्षे कुशाणांचे हल्ले होत राहिले. रामजन्मभूमीला लक्ष्य मानून तेथील मंदिरांवर जो दुसरा हल्ला मुस्लिमांकडून झाला.. मसूद सालार ह्या गझनवी सेनाप्रमुख उत्तर भारत जिंकून अयोध्येकडे निघाला. खुद्द बाबराच्या काळातच ४ लढाया झाल्या. हुमायूँनच्या काळात १०, अकबराच्या काळात २०, औरंगजेबाच्या काळात ३०, नवाब सआदत अलीच्या काळात ५, नवाब नसिरुद्दीनच्या काळात ३, नवाब वाजीद अली शाहच्या काळात २. अशा १९३४ पर्यंत एकूण ७६ किंवा त्यापेक्षा अधिकच लढाया हिंदू रामजन्मभूमी परत प्राप्त व्हावी म्हणून लढले. त्यात जवळपास १० लक्षांहून अधिक हिंदूंनी आपले प्राण गमावले.

 

त्यापैकी महत्वपूर्ण लढायांची माहिती पुढीलप्रमाणे..

ग्रीक आणि रामजन्मभूमी

नंद आणि मौर्य वंशापर्यंत रामजन्मभूमीचे वैभव अक्षुण्ण राहिले. कोणालाही तिच्याकडे वाईट नजरेने पाहण्याची हिम्मत झाली नाही. परंतु २५ शतकांपूर्वी युनान प्रांतातून यवनांनी आक्रमण सुरू केले. कोसल देशात जवळजवळ साठ वर्षे लढाई चालू होती. कधी जय होई तर कधी पराजय. पण त्याचा रामजन्मभूमीवर काही परिणाम झाला नाही. नंतर मात्र कोसल राज्याच्या काही भागांवर आणि कोशांबीवर ८०-९० वर्षे यवन शासकांचे राज्य प्रस्थापित झाले. सुमारे २३ शतकांपूर्वी विदेशी ग्रीक राजा मीनांडर याने अयोध्येवर हल्ला केला.

भारतावर ग्रीक सत्ता स्थापन करण्यासाठी मीनांडरने कूटनीतीचा आश्रय घेतला आणि बौद्ध धर्माचा स्वीकार केला, त्यावेळी या देशात बौद्धांचा प्रभाव बराच वाढला होता. बौद्ध लोकांची मदत मिळवण्यासाठी वरकरणी बौद्ध धर्माचा अंगीकार केला. त्याला वाटले की, जोपर्यंत रामजन्मभूमीवर मंदिर उभे असेल तोपर्यंत ते कोसलाच्या प्रजाजनांना आणि हिंदूंना देश आणि धर्म यासाठी प्राणही देण्याची प्रेरणा देत राहील, म्हणून त्याने मोठे सैन्य जमा करून लवकुशांनी निर्मिलेले रामजन्मभूमीवरील प्राचीन मंदिर बलप्रयोगाने पाडून टाकले. हिंदूंनी या हल्ल्याला प्रखर विरोध केला खरा पण मीनांडरचे सैन्य जास्त असल्यामुळे ते टिकू शकले नाहीत.

 

हजारो वर्षांनंतर रामजन्मभूमीवर झालेले हे पहिले आक्रमण होते. परंतु ग्रीकांना मिळालेला जय अधिक काळापर्यंत टिकू शकला नाही. या आक्रमणामुळे हिंदूंच्या स्वाभिमानाला धक्का बसला. सारा हिंदू समाज संतापाने पेटून उठला, मीनांडरला रामजन्मभूमी आक्रांत करून पुरे तीन महिनेही झाले नाहीत तोच शुंगवंशीय राजा द्युमत्सेन याने इसवीसन पूर्व १५० व्या वर्षी त्यावर पूर्ण सामर्थ्यानिशी प्रतिप्रहार केला आणि त्याच्या राजधानीवर म्हणजे कोशांबीवर स्वामित्व मिळवले. या युद्धात मीनांडर मारला गेला. जागृत हिंदू समाजाने अशा रीतीने लवकरच रामजन्मभूमीच्या अपमानाचा यशस्वी प्रतिशोध घेतला.

हे ही वाचा:

विमानतळावरील व्हायरल व्हिडीओनंतर नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरोने इंडिगोकडून मागविले उत्तर

दहशतवादी पन्नूला आली पुन्हा धमकी देण्याची खुमखुमी!

अयोध्येने उघडला ‘गीता प्रेस’साठी नवा अध्याय!

मंगेशकर कुटुंबियांना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

त्यानंतर काही वर्षे कुशाणांचे हल्ले होत राहिले. आणखी एका प्रबळ विदेशी शक्तीशी संघर्ष सुरू झाल्यामुळे रामजन्मभूमीवर राममंदिराचे पुनर्निर्माण कार्य काही काळ अवरुद्ध झाले. बराच काळ रामजन्मभूमी मंदिर विनाशावस्थेत राहिले, तरीही भाविक हिंदू जनता तिच्या अवशेषांजवळ असलेल्या एका झाडाच्या खाली रामाची पूजा करीतच राहिली.

चक्रवर्ती विक्रमादित्य…

२१ शतकांपूर्वी उज्जैनचे महाराज विक्रमादित्य यांचे लक्ष रामजन्मभूमीच्या जीर्णोद्धाराकडे वळले. भव्य मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली गेली. अनेक वर्षे उजाड असलेल्या अयोध्येचे भाग्य उदयाला आले आणि पुनः एकदा स्फूर्तिस्थान झाले. तिथे ३६० मंदिरे बांधली गेली. कदाचित वर्षातील प्रत्येक दिवसाचे प्रतीक म्हणून ही ३६० देवळे महाराज विक्रमादित्यांनी बांधली असावीत. रामजन्मभूमी स्थानाच्या सभोवती देवळेच देवळे होती. बहुधा त्याच काळापासून सर्व देशात पसरलेल्या प्रत्येक जाती, पंथ, भाषा आणि विविध आखाडे यांनी अयोध्येत आपापली देवळे बांधण्यास आरंभ केला. अयोध्येचे वैभव पुनः एकदा परत आले.

पंधराव्या शतकापर्यंत लहानमोठे राजवंश बदलत राहिले, राजसत्ता बदलली पण अयोध्या आणि रामजन्मभूमीची शोभा दिवसागणिक सतत वाढत गेली. स्वदेशी राजसत्तांच्या अंतर्गतदेखील कितीतरी संघर्ष झाले, पण श्रीराम सर्वांच्याच श्रद्धेचे केंद्र राहिले. इसवीसनपूर्व ५० पासून नवनिर्मित राममंदिरामुळे सर्वांचेच लक्ष अयोध्येकडे वेधले गेले, हा रामजन्मभूमीचाच महिमा होय. राममंदिरामुळे अयोध्यानगरी पुनः एकदा वैभवशाली बनून हिंदू एकतेचे आणि अस्मितेचे प्रतीक म्हणून अनेक वर्षे राहिली.

इस्लाम आणि रामजन्मभूमी..

रामजन्मभूमीला लक्ष्य मानून तेथील मंदिरांवर जो दुसरा हल्ला मुस्लिमांकडून झाला, तेव्हा एका वीर पुत्राने त्यांना असा जबरदस्त तडाखा दिला की, पुढे दोनशे वर्षांपर्यंत कोणत्याही विदेशी आक्रमकाला तिकडे नजर वळवून पाहण्याचे धाडस झाले नाही.सम्राट विक्रमादित्यांनी अशाप्रकारे जीर्णोद्धार केल्यानंतर बरीच वर्षे गेली. हजारोंच्या संख्येने हिंदू जनता अयोध्येला येऊन शरयूच्या अथांग आणि पावन जलधारांत स्नान करून राममंदिरात दर्शनास जात असे आणि रामलल्लाचे दर्शन घेऊन मोठ्या समाधानाने आपापल्या गावी परतत असे.

मसूद सालार हा गझनवी सेना प्रमुख सतरिखपर्यंत (साकेत) आपल्या सैन्यासह मेरठ, फरूखाबाद, कनोज, लखनौ जिंकत पोहोचला होता. त्याने आपल्या वाटेतील मंदिरांचा आणि सतरिखच्याही प्रमुख मंदिरांचा नाश केला आहे. तिथल्या हिंदूंनी प्रखर विरोध केला, पण ते टिकू शकले नाहीत. सतरिख जिंकून तेथे त्याने आपला मुक्काम ठोकला होता.

सतरिख त्यावेळी एक फार मोठे धार्मिक केंद्र होते. मसुद सालारने सतरखा म्हणजेच साकेत जिंकून त्या ठिकाणी पूर्व हिंदुस्थानवर विजय मिळवण्यासाठी आपले मुख्य कार्यालय बनविले, त्याने मियाँ रज्जब कोतवाल आणि आपला काका सैफुद्दीन यांना बहराईचकडे, अमीर हसन अरब याला महूनाकडे आणि मलिक फजल याला वाराणसीकडे पाठवले आणि स्वतः मलिक फिरोजच्या सैन्यासह अयोध्येकडे निघाला. त्याने प्रथम कुबेरटिल्यावरील कुबेरनाथाचे मंदिर फोडले. त्याचा दुसरा हल्ला अयोध्येच्या प्राचीन कनकभवनावर होता. अयोध्येचा राजा प्रबळ होता. तिथल्या राजांच्या सामर्थ्यापुढे त्याला अधिक विध्वंस करता आला नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
131,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा