36 C
Mumbai
Wednesday, May 15, 2024
घरविशेषचांद्रयान-२ अजूनही देतेय चंद्राची माहिती!

चांद्रयान-२ अजूनही देतेय चंद्राची माहिती!

नील आर्मस्ट्राँगच्या अपोलो लँडरची जागाही छायाचित्रात कैद

Google News Follow

Related

चांद्रयान-३ने सन २०२३मध्ये चंद्राच्या दक्षिण धृवावर यशस्वीपणे लँडिंग करून ऐतिहासिक कामगिरी केली. मात्र भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोची चांद्रयान-२ मोहीम अपयशी ठरली असली तरी या यानाचे ऑर्बिटर सन २०१९पासून चंद्राबद्दलची वेगवेगळी माहिती समोर आणून इस्रोलो मदत करते आहे.

चांद्रयान-२चे ऑर्बिटर सन २०१९पासून चंद्राच्या कक्षेभोवती फिरत आहे. चांद्रयानाचे ऑर्बिटर चंद्राच्या खडबडीत पृष्ठभागाची माहिती इस्रोला पाठवत असून ही माहिती संशोधकांना साह्यभूत ठरते आहे. अपोलो ११ आणि अपोलो १२ जेव्हा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले होते, त्या ठिकाणची छायाचित्रे चांद्रयान २ काढली आहेत. तसेच, नील आर्मस्ट्राँगने जेव्हा चंद्रावर पहिले पाऊल टाकले होते, त्या ठिकाणची छायाचित्रेही चांद्रयान २ ऑर्बिटरने सन २०२१मध्ये कैद केली होती. हौशी अवकाशसंशोधक मार्टि मॅकगायर यांनी नासासाठी तयार केलेल्या ऑर्बिट हाय-रिझोल्युशनचा कॅमेऱ्याचा (ओएचआरसी) वापर यासाठी करण्यात आला होता.

हे ही वाचा:

भोजशाळेचा वाद सर्वेक्षणातून सुटेल!

तृणमूल काँग्रेस ‘फ्युचर गेमिंग’चा सर्वात मोठा लाभार्थी; ५४० कोटींची देणगी

आपचे नेते, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना ईडीकडून अटक

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या तिसऱ्या यादीत तामिळनाडूतील ही प्रमुख नावे

ओएचआरसी कॅमेऱ्यांचा वापर चंद्रावरील विविध लँडिंगची ठिकाणे शोधण्यासाठीही केला जात आहे. या छायाचित्रांवरून लँडिंगच्या ठिकाणांची थ्रीडी मॉडेल तयार केली जातात. या छायाचित्रांचा वापर नंतर वैज्ञानिकांना संशोधनासाठी होतो. ओएचआरसी यंत्रणा असलेल्या या कॅमेऱ्यामध्ये स्पेशल सेन्सर आहेत. त्यामुळे अंतराळातील दोन वेगवेगळ्या ठिकाणांवरून एकाच ठिकाणाचे छायाचित्र घेतले जाऊ शकते. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून १२ किमीचा परिसर बघता येऊ शकतो तर तीन किमीचा भाग तपशीलवार बघता येतो.

अपोलो ११ हे सन १९६९मध्ये चंद्राच्या ‘सी ऑफ ट्रँक्विलिटी’ या अंधाऱ्या भागात उतरले होते. तर, अपोलो १२ यान ओशन ऑफ स्ट्रॉर्म्स भागात उतरले होते. हे ठिकाण मानवरहित सर्वेयर ३ यान उतरले होते, त्याजवळ उतरले होते.
चांद्रयान -३ मोहिमेतील विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण धृवावर नेमके कुठे उतरेल, त्या ठिकाणाचा शोध घेण्यासाठी इस्रोने चांद्रयान-२ची मदत घेतली होती. चांद्रयान-२ने जपानच्या स्लिम मोहिमेलाही मदत केली होती. जपानच्या या अवकाशयानाने सन २०२४मध्ये पहिल्यांदाच चंद्रावर पाऊल टाकले होते.चांद्रयान२ मोहिमेत ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हरचा समावेश होता. ऑर्बिटर अजूनही कार्यरत असून लँडर रोव्हर मात्र चंद्रावर आपटले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा