जगातील दिग्गज टेक कंपनीपैकी एक असणाऱ्या ऍप्पलसमोरील संकटे आणखी गडद होऊ लागली आहेत. अधिक किंमत लावून स्मार्टफोनच्या बाजारात एकाधिकारशाही केल्याचा व प्रतिस्पर्धींना कमी केल्याचा आरोप करून अमेरिकी सरकारने आयफोनवर गुरुवारी खटला दाखल केला आहे. एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीविरोधात अमेरिकेतील अन्य राज्यांनीही अशा प्रकारचा खटला दाखल केला आहे.ग्राहकांना स्वस्त स्मार्टफोन किंवा अन्य यंत्रांचा पर्याय निवडण्यापासून रोखण्यासाठी तसेच, शेकडो अब्ज डॉलरची कमाई करण्यासाठी ही कारवाई केली आहे.
स्मार्टफोनच्या मोनोपॉलीचा आरोप
कंपन्या कायद्यांचे उल्लंघन करत असल्याने वापरकर्त्यांना त्याची अधिक किंमत चुकवता कामा नये, अशी भूमिका ऍटर्नी जनरल मेरिक गारलँड यांनी मांडली. जर याला आव्हान न दिल्यास ऍप्पल कंपनी त्यांची स्मार्टफोनवरील मोनोपॉली अधिक घट्ट करेल.
हे ही वाचा:
चांद्रयान-२ अजूनही देतेय चंद्राची माहिती!
भोजशाळेचा वाद सर्वेक्षणातून सुटेल!
तृणमूल काँग्रेस ‘फ्युचर गेमिंग’चा सर्वात मोठा लाभार्थी; ५४० कोटींची देणगी
आपचे नेते, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना ईडीकडून अटक
ऍप्पलने आरोप फेटाळले
‘हे सर्व आरोप निराधार आणि कायदेशीरदृष्ट्या चुकीचे आहेत. आम्ही या विरोधात कठोर भूमिका घेऊ. जर या खटल्यात आम्ही हरलो तर ते धोकादायक उदाहरण ठरेल. त्यामुळे सरकारला नागरिकांसाठी उपयुक्त अशा तंत्रज्ञानाची डिझाइन निर्मिती करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार मिळेल,’ असे ऍप्पलच्या वतीने सांगण्यात आले आहे.
ऍप्पलचे समभाग घसरले
कंपनीवर अमेरिकेत खटला दाखल झाल्यानंतर गुरुवारी वॉल स्ट्रीटवर ऍपलच्या समभागांच्या दरात ३.७५ टक्क्यांची घसरण झाली.