28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेषकमाल आहे...पाकिस्तान दिवाळखोर तरी म्हणे भारतापेक्षा 'आनंदी'

कमाल आहे…पाकिस्तान दिवाळखोर तरी म्हणे भारतापेक्षा ‘आनंदी’

फिनलंड पुन्हा अव्वल

Google News Follow

Related

फिनलंडने पुन्हा एकदा सलग सातव्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देशाचा किताब पटकावला आहे.युनायटेड नेशन्सच्या वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट ( World Happiness Report ) बुधवारी(२० मार्च) जाहीर झाला आहे.जगातील सर्वाधिक आनंदी देशांमध्ये फिनलंडने बाजी मारली आहे.

जगातील आनंदी देश-२०२४ ची यादी आज प्रसिद्ध झाली.यादीनुसार फिनलँडने सलग सातव्यांदा अव्वल स्थान मिळवलं आहे. फिनलँड पाठोपाठ नॉर्डिक राष्ट्रांचे वर्चस्व देखील कायम राहले आहे.फिनलँडनंतर डेन्मार्क, आईसलँड, स्विडन या देशांचा क्रमांक लागला आहे.तर दुसरीकडे, २०२० मध्ये तालिबानने ताब्यात घेतलेला अफगाणिस्तान या यादीमध्ये सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे.यादीमध्ये अफगाणिस्तान शेवटी १४३ व्या स्थानी आहे.

जगातील आनंदी देशाच्या यादीमध्ये भारत १२६ वा क्रमांकावर आहे.विशेष म्हणजे या यादीत पाकिस्तान भारतापेक्षा अव्वल ठरला आहे. कर्जबाजारी आणि आर्थिक संकटांशी झुंजत असलेला पाकिस्तान या यादीत १०८ व्या क्रमांकावर आहे.त्यामुळे या यादीनुसार पाकिस्तान भारतापेक्षा अधिक आनंदी असल्याचे दिसून येते.

हे ही वाचा:

सिद्धू मूसेवाला याचे वडील म्हणतात, पंजाब सरकारकडून होतोय छळ

प्युअर व्हेज फ्लीट सेवेच्या ‘टी-शर्ट’ वरून झोमॅटोचा युटर्न!

राखी सावंत अडचणीत, समीर वानखेडेंकडून मानहानीचा खटला दाखल!

मुस्लिम आता व्होट बँक राहिलेल्या नाहीत?

तसेच पहिल्या दहा देशांमध्ये नेदरलँड आणि ऑस्ट्रेलिया हे दोनच देश आहेत ज्यांची लोकसंख्या दीड कोटींपेक्षा जास्त आहे. पहिल्या २० देशांमध्ये कॅनडा आणि यूके हे दोन देश आहेत ज्यांची लोकसंख्या तीन कोटीपेक्षा अधिक आहे.अफगाणिस्तान, लेबनॉन, जॉर्डन या देशांची तीव्रतेने घसरण झाली आहे, तर पूर्व यूरोपीयन देश सर्बिया, बलगेरिया आणि लटाविया या देशांनी सुधारणा दाखवली आहे.

आनंदी देश कशावरून ठरवेल जाते?

आनंदी देशाची यादी ठरवताना लोकांची मते जाणून घेतली जातात, ज्यामध्ये लोक त्यांच्या आयुष्याबाबत किती समाधानी आहेत, देशाचा दरडोई किती जीडीपी आहे, सामाजिक आधार किती मिळतो, आरोग्य , लोकांचे आयुर्मान, स्वातंत्र्य, भ्रष्टाचार, औदार्य या सर्व गोष्टी गृहीत धरून जगभरातील आनंदी देश ठरवेल जातात.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा