30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरविशेषयोगी आदित्यनाथ सर्वोत्तम मुख्यमंत्री

योगी आदित्यनाथ सर्वोत्तम मुख्यमंत्री

मायावती, अखिलेश आणि प्रियंका गांधी यांच्या अडचणीत वाढ

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीला जवळजवळ ४०० दिवस उरले आहेत. दरम्यान, देशाचा कौल जाणून घेण्यासाठी एक सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेमुळे मायावती, अखिलेश आणि प्रियंका गांधी यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

लोकसभा निवडणूक २०१४ साठी सर्वच पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. दिल्लीची वाट यूपीमधून जाते असे म्हणतात. ज्याने यूपीवर प्रभुत्व मिळवले आहे, दिल्लीही त्याचीच असेल. यूपीबाबत सत्ताधारी भाजपापासून ते प्रमुख विरोधी पक्षांनी बुद्धिबळाचे पट लावायला सुरुवातही केलेली आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणाच्या निकालात अखिलेश यादव, मायावती आणि प्रियंका गांधी यांना हा मोठा धक्का मानला जातो.

इंडिया टुडे आणि सी व्होटरने देशाचा कौल कोणत्या बाजूने आहे, तो जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात ज्या प्रकारे लोकांचा पाठिंबा यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बाजूने दिसला, तो विरोधकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. सर्वेक्षणात देशातील सर्वोत्कृष्ट परफॉर्मर सीएमबद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यानंतर यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ जनतेची पहिली पसंती ठरले. ३९.१% लोकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून निवडले.

विरोधकांसाठी धोक्याची घंटा

सीएम योगींच्या लोकप्रियतेत सातत्याने होणारी वाढ ही यूपीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तयारीत असलेल्या विरोधकांसाठी धोक्याची घंटा मानली जाते. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला यूपीमध्ये बंपर जागा मिळाल्या होत्या. इतकंच नाही तर भाजपाने २०२२ ची यूपी विधानसभा निवडणूक सीएम योगींचा चेहरा पुढे करून लढवली होती आणि भाजपाला बहुमताने पसंती देण्यात आली. १९८५ नंतर राज्याच्या राजकारणात पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा सत्तेवर येण्याची ही पहिलीच वेळ होती.

यूपीमध्ये लोकसभेच्या ८० जागा आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ६२ जागा जिंकल्या. यावेळी भाजपने ८० पैकी ८० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे.

अखिलेशसाठी टेन्शन वाढवणारे सर्वेक्षण

अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष सध्या यूपीमध्ये प्रमुख विरोधी पक्ष मानला जात आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव आणि त्यांची संपूर्ण ब्रिगेड भाजपाला रोखण्यासाठी रणनीती आखत आहे, पण सर्वेक्षणाचा निकाल त्यांच्यासाठी डोकेदुखी वाढवणारा आहे. योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता जनतेमध्ये कायम असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. आझमगढ आणि रामपूरसारख्या बालेकिल्ल्यांमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव होण्यापूर्वीच सपाला मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा :

करमाफीनंतर का उडाला गोंधळ?

बनावट नोटांच्या साठ्यासह नऊ आरोपींना अटक

स्नॅपचॅटवर मैत्री करत फोटो काढले…

मायावतींची खडतर परीक्षा

गेल्या लोकसभा निवडणुकीत १० जागा मिळवून बहुजन समाज पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. मात्र त्यानंतर सपा आणि बसपा यांनी एकत्र निवडणूक लढवली होती. यावेळी दोघेही एकत्र येण्याची चिन्हे नाहीत. अशा स्थितीत लोकसभा निवडणूक ही मायावती यांच्यासाठीही कठीण परीक्षा असणार आहे. पक्षाला मजबूत आणि एकसंध ठेवण्यासाठी पक्षाला २०२४ मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल.

प्रियांकासाठी आव्हान

२०१९ मध्ये काँग्रेसची कामगिरी अत्यंत वाईट होती. यूपीमध्ये काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली होती. ताज्या सर्वेक्षणात काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, पण तो केंद्रातून भाजपाला हटवू शकेल इतकाही नाही. यूपीमध्ये काँग्रेसला बळकट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियंका गांधी यांच्यासाठी पक्षाच्या जागा वाढवणे हे सर्वात मोठे आव्हान असणार आहे.

आज निवडणूक, तर कोणाचे सरकार?

सर्वेक्षणात असाही प्रश्न विचारण्यात आला होता की, आज निवडणुका झाल्या तर कोणाचे सरकार बनेल. सर्वेक्षणात पुन्हा एकदा केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन होईल, असे सांगण्यात आले. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला २९८ जागा मिळतील असे सांगण्यात आले आहे. या सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही सर्वाधिक पसंतीचे राजकारणी आहेत. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ७२ टक्के लोकांनी त्यांच्या कामाला पसंती दिलेेली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा