28.2 C
Mumbai
Monday, July 27, 2026
घरविशेषगोव्यात 'फ्री उमर खालिद' फलक दाखवणारा ताब्यात

गोव्यात ‘फ्री उमर खालिद’ फलक दाखवणारा ताब्यात

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनातला प्रकार

Google News Follow

Related

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान “फ्री उमर खालिद” असा फलक हातात घेतलेल्या एका व्यक्तीला गोवा पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना शनिवारी (२५ जुलै) सायंकाळी पणजी येथील आझाद मैदानावर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सीजेपी आंदोलनाच्या समर्थनार्थ आयोजित सभेत अनेक आंदोलक सहभागी झाले होते. सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास आंदोलक घोषणाबाजी करत असताना एका व्यक्तीच्या हातातील फलकावर “फ्री उमर खालिद, शर्जिल इमाम, भीमा कोरेगाव १६” असे लिहिलेले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

हे ही वाचा:

अनाहत सिंहची विश्वविजेती झेप

जागतिक कांदळवन दिन; भाईंदरमध्ये कांदळवनातून काढला ७५० किलो कचरा

राम काय तुमच्या बापाचा आहे का? आम्हीच रामभक्त

AI मुळे टेक क्षेत्रात नोकऱ्यांवर घाला

पोलिसांनी तत्काळ संबंधित व्यक्तीची चौकशी केली. त्याची ओळख मोहम्मद दानिश अशी झाली. पोलिसांनी त्याच्याकडे ओळखपत्राची मागणी केली असता त्याच्याकडे कोणतेही वैध ओळखपत्र नसल्याचे समोर आले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, काही स्थानिक पत्रकारांनीही त्या व्यक्तीला प्रश्न विचारले होते. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी त्याला चौकशीसाठी पणजी पोलीस ठाण्यात नेले.

या घटनेनंतर भाजप युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी पणजी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करत “फ्री उमर खालिद” फलक दाखवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

परवानगीशिवाय काढलेल्या मोर्च्यावर आधीच एफआयआर

यापूर्वीही सीजेपी समर्थकांनी पणजी येथे काढलेल्या ऐक्य मोर्चाप्रकरणी गोवा पोलिसांनी अज्ञात समर्थकांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, आंदोलकांनी आवश्यक परवानगी न घेता मिरामार सर्कल ते आझाद मैदान असा मोर्चा काढला होता.

उमर खालिद प्रकरण

माजी जेएनयू विद्यार्थी उमर खालिद याला सप्टेंबर २०२० मध्ये दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने २०२० च्या दिल्ली दंगल प्रकरणात अटक केली होती. त्याच्यावर बेकायदेशीर कृती (प्रतिबंध) कायदा (UAPA) तसेच भारतीय दंड संहितेतील विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. तपास यंत्रणांच्या आरोपानुसार, तो दिल्लीतील हिंसाचाराच्या कथित व्यापक कटातील प्रमुख आरोपींपैकी एक आहे. या आरोपांचे उमर खालिद यांनी सातत्याने खंडन केले असून, आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
323,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा