28 C
Mumbai
Monday, December 5, 2022
घरविशेषधर्मांतरणाचा तगादा लावणाऱ्या तरुणाने फेकले तरुणीला चौथ्या मजल्यावरून खाली

धर्मांतरणाचा तगादा लावणाऱ्या तरुणाने फेकले तरुणीला चौथ्या मजल्यावरून खाली

श्रद्धा वालकरच्या हत्येमुळे या घटनेची सर्वत्र चर्चा

Google News Follow

Related

एकीकडे महाराष्ट्रातील श्रद्धा वालकरच्या घृणास्पद मृत्यु आणि त्यामागे लव्ह जिहादचे कारण आहे का, यावर चर्चा सुरू असताना लखनौमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे.

या घटनेत हिंदू मुलगी धर्मांतरणास विरोध करत असल्यामुळे सुफियाँ नावाच्या युवकाने तिला चौथ्या मजल्यावर ढकलून देत तिची हत्या केली.

लखनौमधील डुडा कॉलनीत सुफियाँ हा युवकत निधी गुप्ता या तरुणीला त्रास देत होता. तिने धर्मांतरण करावे अशी सातत्याने त्याची मागणी होती. मात्र ती त्याला दाद देत नव्हती. ते लक्षात घेऊन त्याने तिला इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ढकलून दिले. त्यात ती मृत झाली. त्यानंतर सुफियाँ हा फरार आहे.

हे ही वाचा:

१५ दिवसांपूर्वीच आफताबचे कुटुंब मुंबईला स्थलांतरित झाले होते

श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यापूर्वी ‘त्याने’ पाहिली Dexter वेब सीरिज

आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी-शी जिनपिंग एकमेकांना भेटले, झाला संवाद

श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे घरात असतानाच विकृत आफताबने आणली नवी मैत्रीण

 

सदर सुफियाँने या तरुणीला जबरदस्तीने मोबाईल फोनही दिला होता आणि तिच्यावर धर्मांतरणाची वारंवार तो सक्ती करत होता.

निधी गुप्ताची आई लक्ष्मी गुप्ता यांनी आरोप केला आहे की, सुफियाँने आपल्या मुलीला चौथ्या मजल्यावर ढकलून दिले. खाली पडल्यावर जखमी अवस्थेत असलेल्या निधीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले पण तिथे तिला मृत घोषित करण्यात आले.

सध्या या ठिकाणी पोलिस तपास करत आहेत आणि फरार झालेल्या सुफियाँचा शोध जारी आहे. निधीच्या आईने पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. निधीने हायस्कूलचे शिक्षण घेतले होते. ब्युटी पार्लरमध्ये ती काम शिकत होती. त्याचवेळी सदर आरोपी तिला त्रास देत असे. तो नशापान करत असल्याचेही सांगितले जात आहे.

आपल्या मुलीला त्रास देत असल्यामुळे निधीचे कुटुंबीय तिला घेऊन सुफियाँच्या घरीही गेले होते. त्यांनी तिथे त्याच्या या वागण्याबद्दल संताप व्यक्त केला होता, त्यातून हा वाद विकोपाला गेला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,946चाहतेआवड दर्शवा
1,977अनुयायीअनुकरण करा
53,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा