27 C
Mumbai
Tuesday, December 16, 2025
घरक्राईमनामाएअरगनने दोन डझनहून अधिक माकडांची हत्या!

एअरगनने दोन डझनहून अधिक माकडांची हत्या!

उत्तर प्रदेशातील घटना, आरोपीला अटक

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील मथुरा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एअर गनने गोळीबार करून दोन डझनहून अधिक माकडे मारण्यात आली आहेत. धार्मिक शहरात माकडांच्या हत्येमुळे लोकांमध्ये संताप आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत मृत माकडांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

गोवर्धन पोलीस स्टेशन परिसरातील गिरिराज पर्वताच्या काठावर असलेल्या गोविंद कुंड येथे डझनभराहून अधिक माकडांची हत्या करण्यात आली. येथे पडलेल्या मृत माकडांच्या शरीरावर एअर गनच्या गोळ्यांचे जखमा आढळून आल्या आहेत.

पोलिसांनी मृत माकडांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तथापि, गावकऱ्यांच्या मते, गोविंद कुंडजवळील जानकी दास आश्रमात राहणाऱ्या एका परदेशी नागरिकाने एअर गनचा वापर करत माकडांना मारले आहे. दरम्यान, एसपी (ग्रामीण) त्रिगुणा विसेन यांनी सांगितले की, माकडांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. शवविच्छेदनानंतर, मृत्यूचे कारण स्पष्ट झाल्यानंतर, पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

हे ही वाचा : 

आसाम: भारतविरोधी टिप्पण्या, आमदारासह ४२ जणांना अटक!

‘द केरल स्टोरी’ ला दोन वर्षे पूर्ण काय म्हणाली अदा शर्मा?

जम्मू-काश्मीरातील कारागृहांवर दहशतवाद्यांचा डोळा, सुरक्षा हायअलर्टवर!

अफजाल अन्सारी म्हणतात कठोर कारवाई करा

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. मुक्या प्राण्याला मारून काय सिद्ध करायचे आहे? या माकडांचा काय दोष होता की त्यांना इतक्या क्रूरपणे मारण्यात आले?, असा सवाल लोक करत आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कारवाई सुरु आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा