32 C
Mumbai
Thursday, December 18, 2025
घरविशेषएअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह म्हणाले, एकदा मी ठरवलं तर मी...

एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह म्हणाले, एकदा मी ठरवलं तर मी स्वतःचंही ऐकत नाही!

सलमान खानचा संवाद ऐकवून हवाई दल प्रमुखांनी दिले स्पष्टीकरण

Google News Follow

Related

‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे पाकिस्तानवर निर्णायक आघात केल्यानंतर भारताच्या लष्कराच्या पराक्रमाची दखल संपूर्ण जग घेत आहे. भारतीय हवाई दलाला आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात शक्तिशाली वायुसेना मानलं जात आहे. अशा परिस्थितीत एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह यांनी गुरुवारी केलेलं विधान पाकिस्तानसाठी थरकाप उडवणारं ठरलं.

त्यांनी सीआयआय समिटमध्ये बोलताना स्पष्ट शब्दांत सांगितलं, “प्राण जाईल पण वचन नाही – हेच आमचे ध्येय आहे.”
“एकदा मी ठरवलं, तर मग मी स्वतःचंही ऐकत नाही.” (सलमान खानच्या डायलॉगचा वापर करत सूचक इशारा) ते म्हणाले की, यानंतर ते म्हणाले, “भले ती स्थलशक्ती (Land Power) असो किंवा नौदलशक्ती (Naval Power), वायुदल नेहमीच अस्तित्वात राहील. वायुदलाची भूमिका या दोन्हींसाठी महत्त्वाची आणि आकर्षक असावी लागेल.”

संकल्प आणि आत्मविश्वासाचा संदेश

सीआयआय बिझनेस समिटमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत त्यांनी हवाई दलाच्या दृष्टिकोनातून स्पष्ट इशारा दिला की, भारत आता कोणत्याही कारवायेला सुस्पष्ट आणि थेट उत्तर देईल. ऑपरेशन सिंदूरमुळे भारताच्या भविष्यातील दिशा स्पष्ट झाली आहे. “आपल्याला आता विचार करण्याची पद्धतही पुन्हा संरचित करावी लागेल.”

हे ही वाचा:

मान्सूनमध्ये स्वतःला ठेवा तंदुरुस्त आणि निरोगी

काळाचौकी, भोईवाडा विभाग १०० टक्के भोंगा मुक्त!

तमन्ना, प्रिया आणि दीपकची सेमीफायनलमध्ये; भारतासाठी कांस्यपदक नक्की!

तुषार देशपांडे सज्ज आहे इंग्लंड जिंकायला!

टेक्नोलॉजी आणि आत्मनिर्भरतेवर भर

एअर चीफ मार्शल म्हणाले, दररोज आपण नव्या तंत्रज्ञानाचा शोध घेत आहोत. भविष्यात आपण उद्दिष्टे साध्य करू शकू. एएमसीए प्रकल्पात खाजगी क्षेत्राचा समावेश होणार आहे, जे एक मोठं पाऊल आहे. त्यांनी संरक्षण खरेदी आणि स्वदेशी प्रकल्पांमध्ये होत असलेल्या देरीवर नाराजी व्यक्त केली. केवळ भारतात उत्पादन यावर भर नको, तर डिजाईनिंगलाही प्रोत्साहन देणं आवश्यक आहे. उद्योग आणि सैन्य यांच्यात विश्वास आणि पारदर्शकता आवश्यक आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा