28.6 C
Mumbai
Wednesday, November 4, 2026
घरविशेषवाचनाची सवय कमी होत असल्याबद्दल काय म्हणाल्या हेमा मालिनी?

वाचनाची सवय कमी होत असल्याबद्दल काय म्हणाल्या हेमा मालिनी?

Google News Follow

दरवर्षी १९ जून रोजी ‘राष्ट्रीय वाचन दिन’ साजरा केला जातो, जो केरळमधील प्रसिद्ध शिक्षक पी. एन. पणिक्कर यांना समर्पित आहे. या खास दिवसाच्या निमित्ताने अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला, ज्यात त्या एक पुस्तक वाचताना दिसतात. त्या फोटोद्वारे त्यांनी हे सांगितले की, वाचनाची सवय वय किंवा व्यवसायावर अवलंबून नसते. तसेच पणिक्कर यांच्या कार्याचा गौरव केला. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये हेमा मालिनी आरामात सोफ्यावर बसून एक जाड पुस्तक वाचताना दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावर शांतता आणि एकाग्रतेचं प्रतिबिंब स्पष्ट दिसतं. या फोटोद्वारे त्यांनी वाचनाच्या सवयीला प्रोत्साहन देण्याचा संदेश दिला. त्यांनी सांगितले की, पुस्तके केवळ ज्ञानाचं साधन नसून आत्मिक समतोलासाठीही उपयुक्त ठरू शकतात.

आपला फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं : मी नेहमीच एक सक्रिय जीवनशैली जपली आहे. कधी कधी या व्यस्त जीवनात मी अध्यात्मिक पुस्तकं वाचायला आवडते. यामुळे मला माझ्या जीवनाच्या उद्दिष्टांशी आणि ज्यांची सेवा करत आहे, त्यांच्याशी जोडून घेण्यास मदत मिळते. पुस्तकं वाचताना मला खूप शांतता मिळते. ‘राष्ट्रीय वाचन दिना’च्या निमित्ताने, लोकांमध्ये वाचनाची सवय कमी होत आहे, ही गोष्ट मला चिंताजनक वाटते. त्या पुढे म्हणाल्या, म्हणूनच मी ‘इंडिया रीड्स, इंडिया राइज’ या मोहिमेचे पूर्ण समर्थन करते, जी माझी मैत्रीण रीता राममूर्ती गुप्ता आणि मीनाक्षी लेखी यांनी सुरू केली आहे.

हेही वाचा..

खलिस्तानी अतिरेक्यांसाठी कॅनडा आश्रयस्थळ

विमानांवर लेझर लाइट टाकणाऱ्यांचा शोध सुरू

बिहारच्या फल्गु नदी पाणीपातळीत अचानक वाढ

रांची, पटणामधील अनेक ठिकाणी ईडीची छापेमारी

पोस्टच्या शेवटी त्यांनी एक संस्कृत श्लोक लिहिला –
“पठतु भारतम्, वर्धताम् भारतम्।”
अर्थ : “भारत वाचो, भारत वाढो.”
पी. एन. पणिक्कर यांना “भारताच्या ग्रंथालय चळवळीचे जनक” म्हणून ओळखले जाते. त्यांचा ठाम विश्वास होता की शिक्षण आणि पुस्तके कोणत्याही व्यक्ती आणि समाजाच्या प्रगतीसाठी सर्वोच्च साधने आहेत. त्यांनी लोकांना वाचनासाठी प्रेरित केले आणि १९४५ साली केरळमध्ये पहिली सार्वजनिक ग्रंथालय सुरू केली. यानंतर संपूर्ण राज्यभरात ग्रंथालयांची चळवळ सुरु झाली. त्यांच्या ह्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी १९९६ पासून १९ जून हा दिवस राष्ट्रीय वाचन दिन म्हणून घोषित करण्यात आला. या दिवशी लोकांना पुस्तकं वाचण्यासाठी, खरेदी करण्यासाठी आणि वाचनाच्या सवयीला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित केलं जातं.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा