27.9 C
Mumbai
Thursday, October 29, 2026
घरविशेषबुलेट ट्रेन ठाण्यातून जाणार!

बुलेट ट्रेन ठाण्यातून जाणार!

हायस्पीड रेल्वेमार्फत हा प्रस्ताव राबविण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

Google News Follow

मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेन मार्गावर ठाणे जिल्ह्यातले म्हातार्डी रेल्वे स्थानक ठाणे, कोपर रेल्वे स्थानक तसेच तळोजा मेट्रोला कसे व्यवस्थित जोडता येईल हे पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. आज (६ ऑक्टोबर) एमएसआरडीसी कार्यालयात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, महारेल तसेच हायस्पीड रेल्वेचे अधिकारी देखील उपस्थित होते.

ठाणे जिल्ह्यात बुलेट ट्रेनचे स्थानक दिवाजवळ म्हातार्डी येथे उभारले जात आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील हे महत्त्वाचे जंक्शन असेल. पुढे चालून हे स्टेशन एकात्मिक वाहतूक केंद्र बनेल. हे स्थानक बुलेट ट्रेनसह रेल्वे, मेट्रो, बस आणि महामार्ग यांना जोडेल. महारेल ने यासंदर्भात एक विस्तृत आरेखनाचे सादरीकरण केले. यामध्ये म्हातार्डी स्थानक हे ठाणे रेल्वे स्थानक, कोपर तसेच तळोजा मेट्रो यांना कसे जोडता येऊ शकेल याचे संकल्पचित्र होते.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात हायस्पीड रेल्वे प्राधीकरनास हा प्रस्ताव त्यांच्या माध्यमातून राबवता कसा येईल हे पाहण्याच्या सूचना दिल्या. हायस्पीड रेल्वे प्रधीकार्णाने यावर सकारात्मक भूमिका घेतली असून हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला पाठवण्यास मान्यता दिली आहे. अशा रीतीने हे बुलेट ट्रेन स्थानक जोडले गेल्यास ठाणे रेल्वे स्थानक, कोपर तसेच नवी मुंबईतील तळोजा येथील मेट्रो स्थानक येथून प्रवाशांना सहजपणे म्हातार्डी येथे येता येईल.

हे ही वाचा : 

बॉलिवूडमधील एकमेव सोलो महिला संगीतकाराची कहाणी…

मालेगाव येथील ३२७३ बोगस मतदारांची नावे रद्द करा !

मुंबईतील साकीनाका येथे “लव्ह जिहाद”

इल्युजन ऑफ ट्रुथ; २०१६चे संशोधन, काँग्रेसचे राजकारण

 

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा