25 C
Mumbai
Monday, November 10, 2025
घरविशेषनवी मुंबई विमानतळ मुंबईशी जोडण्यासाठी बोगदा!

नवी मुंबई विमानतळ मुंबईशी जोडण्यासाठी बोगदा!

प्रस्तावाची व्यवहार्यता तपासण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे एमएमआरडीएला निर्देश

Google News Follow

Related

नवी मुंबई विमानतळ हे मुंबईशी बोगद्याने जोडता येईल त्याची व्यवहार्यता तपासून विस्तृत अहवाल सादर करण्याचे निर्देश उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (६ ऑक्टोबर) एनएमआरडीएस दिले आहेत. आज एमएसआरडीसी कार्यालयात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, महानगर आयुक्त डॉ संजय मुखर्जी तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नवी मुंबई विमानतळ हे मुंबईतले दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून पंतप्रधानांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होत आहे. या विमानतळाची प्रवासी क्षमता वर्षाला दोन कोटी असेल. साहजिकच या विमानतळासाठी मुंबईहून मोठ्या प्रमाणावर वाहने ये जा करतील. सध्या जे मार्ग आहेत ते अपुरे पडण्याची शक्यता आहे कारण वरचेवर नवी मुंबई विमानतळावर विमानांची वाहतूक वाढणार आहे.

हे ही वाचा  : 

ठाणे, कोपर रेल्वे स्थानकाला बुलेट ट्रेन स्थानकाशी जोडणार!

बॉलिवूडमधील एकमेव सोलो महिला संगीतकाराची कहाणी…

मालेगाव येथील ३२७३ बोगस मतदारांची नावे रद्द करा !

इल्युजन ऑफ ट्रुथ; २०१६चे संशोधन, काँग्रेसचे राजकारण

या विमानतळाची राष्ट्रीय महामार्ग, उपनगरीय रेल्वे, मेट्रो, जलवाहतूक नेटवर्कशी अखंड जोडणी करणे गरजेचे ठरणार असून यादृष्टीने सध्याचा सी लिंक, बीकेसी ते नवी मुंबई विमानतळ असा बोगदा करता येतो का याची चाचपणी करण्यास उपमुख्यमंत्र्यांनी महानगर आयुक्तांना सांगितले आहे. त्यासाठी या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासणे, एकूणच भू व सागरीय वाहतुकीसाठी हा मार्ग उपयुक्त कसा ठरेल ते अभ्यासण्यासाठी तसेच एकूणच आरेखनासाठी तज्ज्ञांची मदत घेण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
280,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा