30.8 C
Mumbai
Sunday, June 14, 2026
घरविशेषभारत आता ग्राहक नाही, निर्माताही आहे!

भारत आता ग्राहक नाही, निर्माताही आहे!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समध्ये केले भाषण

Google News Follow

Related

भारताने जागतिक उपाययोजनांचा केवळ ग्राहक म्हणून राहण्याऐवजी आता जगाच्या या वाटचालीत योगदान देणारा देश म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. फ्रान्समधील नाईस येथे त्यांनी आणि एम्यॅन्युअर मॅक्रॉन यांनी संयुक्तपणे ‘भारत इनोव्हेट्स’ कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

भारत-फ्रान्स संबंधांना “विशेष” म्हणत मोदी म्हणाले की, हे संबंध केवळ समान हितसंबंधांवर नव्हे तर जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठीच्या समान दृष्टीकोनावर आधारित आहेत.

“या नात्यात जिव्हाळा आणि दृढ विश्वास दोन्ही आहेत. हे नाते नवकल्पना, प्रेरणा, समान मूल्ये आणि सामायिक दृष्टिकोनाचे प्रतीक आहे,” असे ते म्हणाले. अलीकडच्या काळात नवकल्पना आणि जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी दोन्ही देशांनी संयुक्त उपक्रमांद्वारे भागीदारी अधिक मजबूत केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावर्षी सुरू करण्यात आलेल्या भारत-फ्रान्स नवकल्पना वर्षाने अधिक सखोल सहकार्याचा पाया घातला असून, भारत इनोव्हेट्स हे व्यासपीठ भारतीय प्रतिभा आणि युरोपियन भांडवल यांच्यातील दुवा बनत असल्याचे मोदी म्हणाले. हे व्यासपीठ भारताच्या प्रतिभेला आणि युरोपच्या भांडवलाला जोडणारा पूल ठरत आहे. यामुळे भारतीय तरुणांना युरोपियन कौशल्य आणि अनुभवाशी जोडले जाण्याची संधी मिळत आहे,” असे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

वेदांताच्या चार नव्या कंपन्यांचे शेअर बाजारात पदार्पण

फक्त विजय नाही, मोठा विजय हवा!

निष्क्रिय सोन्यातून कमाई की जोखीम ?

फिफा विश्वचषकात स्कॉटलंडचा ३६ वर्षांनंतर पहिला विजय

राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करताना मोदी म्हणाले की, त्यांच्या भारत दौऱ्यामुळे २१व्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र काम करण्याची गरज अधिक अधोरेखित झाली. भारतामध्ये सुरू असलेल्या परिवर्तनाचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, देशात सध्या स्टार्टअप क्रांती सुरू आहे. तरुण उद्योजक मानवतेच्या हितासाठी विविध समस्यांवर उपाय शोधत आहेत.

त्यांनी सांगितले की, भारतात आता दोन लाखांहून अधिक स्टार्टअप्स आहेत आणि ते देशाच्या आर्थिक विकासाबरोबरच जागतिक अर्थव्यवस्थेलाही योगदान देत आहेत. “भारत इनोव्हेट्सचा मुख्य उद्देश आपल्या तरुणांच्या प्रयत्नांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे,” असे मोदी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, भारतातील अनेक तरुण उद्योजक ग्रामीण परिवर्तनापासून ते अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत विविध क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण उपाय विकसित करत आहेत.

भारताची नवकल्पना परिसंस्था शाश्वत विकास आणि जागतिक प्रभाव यांवर अधिक लक्ष केंद्रित करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. “भारत शाश्वत भविष्य आणि संपूर्ण जगासाठी नवकल्पना करत आहे,” असे ते म्हणाले.

भविष्यातील बदल घडवून आणणाऱ्या तंत्रज्ञानांचा उल्लेख करताना मोदी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग, जैवतंत्रज्ञान, अंतराळ तंत्रज्ञान आणि प्रगत पदार्थ विज्ञान यांचा उल्लेख केला. भूराजकीय संघर्ष आणि हवामान बदलामुळे जग अभूतपूर्व अस्थिरतेचा सामना करत असताना ही तंत्रज्ञाने अधिक महत्त्वाची ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

या आव्हानांमुळे अडचणी निर्माण होत असल्या तरी नवकल्पनांवर आधारित विकासासाठी मोठ्या संधीही निर्माण होत आहेत, असे मोदी म्हणाले. भारतातील तरुण नवकल्पक संपूर्ण मानवजातीच्या हितासाठी उपयोगी ठरतील असे उपाय विकसित करत आहेत आणि त्यामुळे जागतिक नवकल्पना अर्थव्यवस्थेत भारताचे योगदान अधिक मजबूत होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
314,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा