छावा या विकी कौशल अभिनित चित्रपटात महत्त्वाची भूमिका करणाऱ्या तसेच वागळे की दुनिया आणि कुमकुम भाग्य यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधील भूमिकांसाठी ओळखली जाणारी २२ वर्षीय अभिनेत्री संचिता उगले हिने पालघर जिल्ह्यातील तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, “आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. तिने स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूचे नेमके कारण तपासातून स्पष्ट होईल. त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. सध्या कोणतीही संशयास्पद बाब आढळलेली नाही. तिच्या वडिलांनीही कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे सांगितले आहे.”
संचिता उगले नालासोपारा पूर्व येथील आचोळे गावातील साई संतोषी इमारतीत आई-वडील आणि बहिणीसोबत राहत होती. घटना घडली तेव्हा ती घरी एकटीच होती.
हे ही वाचा:
मे महिन्यात दुचाकी विक्री १९ लाखांच्या पार
भारत-स्लोव्हाकिया संबंधांना ‘व्यापक भागीदारी’चा दर्जा!
मदरशातील शिक्षकासोबत लग्न ठरल्याने मुलीने संपवले जीवन
“ट्रम्प यांचा करार बंधनकारक नाही”
पोलीसांनी सांगितले की, तिने आपल्या बेडरूममधील छताच्या पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास लावला. ही घटना १४ जून रोजी सायंकाळी सुमारे ७ ते ७.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. खोलीचा दरवाजा आतून बंद होता. तिला तातडीने उपचारासाठी वसई-विरार महानगरपालिका रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.
१५ जून रोजी तिचे वडील मचिंद्र उगले यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे आचोळे पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद केली. संचिता कुमकुम भाग्य मालिकेत दिया टंडन आणि वागळे की दुनियामध्ये रुचिता जेटली या भूमिकांमुळे प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर ती ‘दिलवाली दुल्हा ले जाएगी’ या मालिकेत अभिनेता सोराब बेदी यांच्यासोबत सुकून या भूमिकेत दिसली होती.
दूरदर्शन मालिकांबरोबरच तिने चित्रपटांमध्येही काम केले होते. विकी कौशल अभिनित छावा चित्रपटात तिने ताराबाई ही भूमिका साकारली होती. घटनेपूर्वीही ती सोशल मीडियावर नियमितपणे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत होती.







