28 C
Mumbai
Friday, August 7, 2026
घरस्पोर्ट्सवैभव सूर्यवंशी टी-२०चा बादशहा बनेल!

वैभव सूर्यवंशी टी-२०चा बादशहा बनेल!

जोस बटलरची भविष्यवाणी

Google News Follow

Related

इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जोस बटलर टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. द हंड्रेड स्पर्धेत दमदार खेळी करत त्याने वेस्ट इंडिजचा किरॉन पोलार्ड याचा विक्रम मागे टाकला. मात्र, या ऐतिहासिक कामगिरीनंतर बटलरने भारताच्या अवघ्या १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीबाबत केलेल्या भाकिताची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

‘स्टार स्पोर्ट्स’शी संवाद साधताना बटलर म्हणाला, “टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होणे ही खूप मोठी भावना आहे. पण एक दिवस हा विक्रम कोणी तरी मोडेल आणि तो खेळाडू कदाचित वैभव सूर्यवंशी असेल.”

अवघ्या १५व्या वर्षी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वैभवने गेल्या वर्षभरात आपल्या स्फोटक फलंदाजीने क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तो भारताकडून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला.

झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेत वैभवने तुफानी फलंदाजी करत सर्वांची मने जिंकली. त्याने अवघ्या १८ चेंडूत अर्धशतक झळकावले. तर तिसऱ्या सामन्यात ४९ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांसह ८१ धावांची झंझावाती खेळी साकारली.

यापूर्वी आयपीएल २०२६ मध्येही वैभवचा दबदबा पाहायला मिळाला होता. त्याने १६ सामन्यांत ४८च्या सरासरीने आणि तब्बल २३७च्या स्ट्राइक रेटने ७७६ धावा करत स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा मान पटकावला होता.

दरम्यान, द हंड्रेड स्पर्धेत मँचेस्टर सुपर जायंट्सकडून खेळताना बटलरने २० चेंडूत ५१ धावांची धडाकेबाज खेळी केली. या खेळीत त्याने २ चौकार आणि ६ षटकार लगावले. या कामगिरीसह त्याच्या नावावर आता टी-२० क्रिकेटमध्ये १४,८३३ धावा जमा झाल्या आहेत. त्याने १४,८०३ धावा करणाऱ्या किरॉन पोलार्डला मागे टाकले असून १४,५६२ धावांसह ख्रिस गेल तिसऱ्या स्थानावर आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
326,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा