28 C
Mumbai
Saturday, August 29, 2026
घरसंपादकीयपोलिसांचे चालले आहे काय? उबाठा चा ईदचा जुलूस हनुमान मंदिर झाकले...

पोलिसांचे चालले आहे काय? उबाठा चा ईदचा जुलूस हनुमान मंदिर झाकले…

Google News Follow

Related

मुंबई पोलिसांनी मुस्लिम सणावारांच्या काळात हिंदू आणि हिंदू मंदिरे सुरक्षित ठेवण्याचा एक नवा फंडा शोधला आहे. ईदच्या मिरवणुकीच्या काळात मुस्लिम दगडफेक करतील, अंडी फेकतील म्हणून मंदिर कापडामध्ये लपेटून बंद ठेवण्याची उपाययोजना पोलिसांनी केली. मिरवणूक उबाठा आमदाराच्या नेतृत्वाखाली निघाली होती, हे विशेष आहे. हिंदू ग्रहणाच्या काळात देव झाकतात, तसा काहीसा हा प्रकार. हा प्रकार दुर्दैवी आहे, धक्कादायक आहे आणि त्याहीपेक्षा जास्त धोकादायक आहे. मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेला ग्रहण लागल्याचे हे चिन्ह आहे. हे मुंबईत सर्रास घडलेला नाही. घटना एकांडी आहे, परंतु तरीही या घटनेची दखल घेतली पाहिजे. याचा निषेध झाला पाहिजे आणि कारवाईची मागणीही झाली पाहिजे. आज दुर्लक्ष केले, तर उद्या हा ट्रेंड बनण्याची भीती आहे.

अंधेरी पश्चिम मतदारसंघात काल ईदच्या निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली. उबाठा शिवसेनेचा आमदार हारून खान याने यात पुढाकार घेतला होता, त्याची मुलगी इथे नगरसेविका आहे. मिरवणुकीत पॅलेस्टाईनचे झेंडे फडकावण्यात आले. हिंदुस्तानच्या नकाशाच्या मधोमध मशीद दाखवण्यात आली. ‘मशीद वही बनाएंगे’च्या घोषणा देण्यात आल्या. हा भाग आंबोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो. पोलिसांनी या चिथावणीखोर घोषणांवर कारवाई केली की नाही, ठाऊक नाही; परंतु एका बाजूला असलेल्या हनुमान मंदिरावर देऊळ बंद कारवाई करण्यात आली. मंदिर पूर्णपणे झाकण्यात आले आणि दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले. या प्रकारामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या असून जनतेमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

मुंबई पोलिसांची तुलना एकेकाळी स्कॉटलंडच्या पोलिसांशी केली जायची. आज तो दरारा संपुष्टात आलाय की काय, असा प्रश्न निर्माण करणारी ही घटना आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. हे शहर धावते राहील, शांत राहील याची जबाबदारी मुंबई पोलिसांची आहे. काही अपवाद वगळता पोलिस ही जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडत असतात; परंतु काही वेळा अशा घटना घडतात, ज्यामुळे या लौकिकाला पूर्णपणे गालबोट लागते. उपनगरामध्ये अशीच एक घटना घडली आहे. ईदच्या मिरवणुकीमुळे जोगेश्वरी पश्चिम येथील एक हनुमान मंदिर सुमारे १२ तासांपेक्षा जास्त काळ पांढऱ्या कापडात झाकून ठेवण्यात आले. हे मंदिर बजरंगबलीचे होते. बजरंगबलीसुद्धा असुरक्षित आहेत, अशी भीती मुंबई पोलिसांना वाटली आणि सुरक्षेसाठी त्यांचे मंदिर झाकून ठेवण्याचा प्रताप मुंबई पोलिसांनी केला.

हे ही वाचा:

श्रावणात मटणासाठी हट्ट; वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

भारत-कॅनडात रेमिटन्स प्रक्रिया सुलभ करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा

शेअर बाजारात जोरदार कमबॅक; सेन्सेक्स ३३१ अंकांनी वधारला

अमेरिकेवर ४० ट्रिलियन डॉलरचे कर्ज

 

जोगेश्वरी पश्चिमेचा भाग मुस्लिमबहुल आहे. दरवर्षी इथे ईदची मिरवणूक निघते. मुंबईतील अनेक भागांतून ईदची मिरवणूक निघते; पण कुठेही घडला नाही, असा प्रकार जोगेश्वरीत घडला. मिरवणुकीच्या काळात स्वामी विवेकानंद मार्गाला लागून असलेल्या घासवाला कंपाऊंडमध्ये ही घटना घडली. ईदच्या मिरवणुकीच्या काळात हनुमान मंदिराचे काय होईल, अशी भीती आंबोली पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या मनात निर्माण झाली. हनुमानाच्या सुरक्षेसाठी ईदच्या मिरवणुकीच्या बऱ्याच आधी हे संपूर्ण मंदिर झाकून ठेवण्यात आले. लोकांनी ओरडा केला, तरीही पोलिसांनी दाद दिली नाही. ही बाब लक्षात येताच हिंदू जागरण समितीचे सूरज देशपांडे आणि अन्य कार्यकर्त्यांनी इथे धाव घेतली. “हे मंदिर पांढऱ्या कपड्याने का झाकले आहे? कोणाला विचारून तुम्ही हा निर्णय घेतला?” असा सवाल कार्यकर्त्यांनी पोलिसांना केला. त्यावेळी, “हा माझा देव आहे, तो सुरक्षित राहील या काळजीपोटीच आम्ही मंदिर झाकण्याचा निर्णय घेतला,” असे आंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीयुत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. “कायदा व सुव्यवस्था राखणे हे तुमचे काम आहे; परंतु तुम्ही कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई करा, मंदिरावर कसली कारवाई करताय?” असा सवाल हिंदू जागरण मंचाच्या कार्यकर्त्यांनी केला. यावर बराच वादविवाद झाला. पोलिसांनी बराच काळ खिंड लढवली. मिरवणूक पूर्ण झाल्यानंतर रात्री आठच्या सुमारास या मंदिरावर टाकलेले पडदे दूर करण्यात आले.

उद्धव ठाकरेंचा हा पक्ष मतांसाठी हिंदू समाजाच्या मुळावर कसा येतो आहे, कट्टरवाद्यांची ताकद कशी वाढवतो आहे, याची ही झलक आहे. भावना फक्त मुस्लिमांच्या दुखावतात, हिंदूंना धार्मिक भावना नसतात, त्यांना कितीही चेपले तरी प्रादेशिक अस्मितेच्या नावाखाली ते मत देतातच, असा गैरसमज असलेल्या राजकीय पक्षांमध्ये उबाठाचा अधिकृत समावेश झालेला आहे. मंदिर झाकण्याच्या प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे. हा प्रकार उबाठाचा आमदार हारून खान याच्या दबावामुळे झालाय का, याचा शोध गृहमंत्र्यांनी घेतला पाहिजे. हिंदूंना गृहीत धरून आमदाराचे चुकीचे आदेश किंवा दबाव मानला गेला असेल, तर पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.

जोगेश्वरीतील घटना आपण भारतात राहतो की पाकिस्तानात, हा प्रश्न निर्माण करणारी आहे. ही मुंबई आहे की कराची किंवा ढाका, असा सवाल मनामध्ये उपस्थित करणारी ही घटना आहे. मुस्लिम समाज आक्रमक आहे, त्यातले काही हिंदू संस्कृतीचा द्वेष करतात; त्यामुळे रामनवमी, गणेशचतुर्थी आणि नववर्ष स्वागतयात्रेला सुरक्षा देण्यासाठी पोलिस तैनात करावे लागतात, कारण मशिदीतून दगडफेक किंवा हल्ला होण्याची भीती असते.

जिहाद्यांच्या आक्रमकतेची समस्या सोडवण्यासाठी हिंदूंना वेठीला धरण्याचे प्रकार वर्षानुवर्षे होत आहेत. “मशिदीसमोरून मिरवणूक येऊ द्यायची नाही, मशिदीसमोर डीजे वाजवायचा नाही, गुलाल उधळायचा नाही,” अशा पोलिसांच्या सूचना असतातच. आता मुस्लिम सणावाराच्या काळात मंदिर झाकण्याची नवी आयडिया पोलिसांनी काढली आहे. म्हणजे हिंदूंचे सणवार सुरक्षित नाहीत आणि त्यांची मंदिरेसुद्धा, याची कबुली पोलिसांनी दिली आहे. कायदा-सुव्यवस्था ठेवण्यासाठी हिंदूंना चेपणे हे धोरण काँग्रेसच्या राजवटीत सर्रास होते. तेच हिंदुत्ववादी सरकारच्या काळात पोलिस करीत असतील, तर अशा अधिकाऱ्यांना ताळ्यावर आणणे हे सरकारचे काम आहे. ईदच्या मिरवणुकीच्या काळात आसपासची मंदिरे बंद करा, हा गृहखात्याचा आदेश असण्याची सुतराम शक्यता नाही. राज्याचे मुख्यमंत्री घनघोर हिंदुत्ववादी आहेत; त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी याची दखल घेतलेली बरी.

पोलिसांची ही मानसिकता अत्यंत धोकादायक आणि धक्कादायक आहे; कारण मुस्लिम सणाच्या काळात उन्मादी जमाव हिंदूंना, हिंदू मंदिरांना आणि हिंदू देवतांना टार्गेट करू शकतो, या भीतीने जर मुंबई पोलिस इतके भेदरलेले असतील, तर मुंबईच्या सुरक्षेचे काही खरे नाही. मंदिर झाकून ठेवणे हे एक पाऊल झाले; पुढचे पाऊल ईद किंवा मोहरमच्या मिरवणुकांच्या काळात “घरातून बाहेर पडू नका, रस्त्यावर येऊ नका, खिडक्या बंद करून ठेवा,” अशा प्रकारच्या सूचनासुद्धा हिंदूंना दिल्या जाऊ शकतात आणि “हिंदूंच्या सुरक्षेसाठीच हे सगळे आहे,” अशी बतावणी केली जाऊ शकते. नववर्ष स्वागतयात्रेच्या काळात भेंडी बाजारातील एखादी मशीद झाकून ठेवण्याची हिंमत पोलिस करू शकतील का? तसा प्रयत्न केला तर काय होईल मुंबईत?

हिंदू कायदा-सुव्यवस्था मानतो, दंडेली करत नाही, पोलिसांचा आदर करतो, बऱ्या-वाईट कारणासाठी झुंडीने पोलिस ठाण्यांना घेराव घालत नाही, रस्ता रोको करत नाही; म्हणून पोलिस मनमानी करतायत का? पोलिसांनी केलेले हे कर्म अत्यंत भित्रे आणि निंदनीय आहे. सुरक्षेच्या अशा नेभळ्या उपाययोजना हिंदूंना मान्य नाहीत. हिंदूंच्या मंदिरांकडे वाकड्या नजरेने पाहिले तर घरादारावर बुलडोझर फिरेल, जर काही वावगे करण्याचा प्रयत्न केला तर पोलिस येऊन ठोकतील, कदाचित एनकाउंटरसुद्धा करतील, अशी दहशत जिहाद्यांच्या मनात हवी. अशी दहशत नसेल, तर झाकून ठेवलेल्या मंदिरावरसुद्धा दगड पडू शकतात; अशा मंदिरातील मूर्तीसुद्धा सुरक्षित राहणार नाहीत. जिहाद्यांच्या भीतीने मंदिरे झाकणारे पोलिस उद्या लफंग्यांच्या भीतीने “तरुणींनी घरातून बाहेर पडू नका, कार्यालयात जाऊ नका,” अशा अटी-शर्तीसुद्धा घालतील. रस्त्यावर कुत्रे पिसाळले म्हणून घरात बसा हे सांगण्यात शहाणपण नाही, इलाज कुत्र्यांचा केला पाहिजे; लोकांना घरी बसवणे हा उपाय नाही.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
329,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा