अयोध्येतील श्रीराम मंदिराचे नवनियुक्त सीईओ निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांचा एक फेक व्हिडियो व्हायरल झाला. या व्हिडीयोमध्ये ते डोक्यावर दारुचा ग्लास घेऊन नाचताना दाखवले आहेत. एका पाकिस्तानी फेसबुक पेजवर पोस्ट केलेला हा व्हीडीयो कॉकरोच अभिजीत दिपकेने तो शेअर केला. बोस्टन युनिवर्सिटीत तो फक्त धुणीभांडी करायला गेला होता, हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले. देशात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीबाबत सतत नकारघंटा वाजवणाऱ्या लोकांचा उल्लेख अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नाराज फुफा’ असा केला होता. समस्या अशी आहे की, या फुफा मंडळींनी गेल्या काही वर्षांत भारतात त्यांची पिलावळ मोठ्या संख्येने निर्माण केली आहे. नदी तलावांच्या पर्यावरणाची वाट लावणाऱ्या सकर माऊथ कॅटफिशसारखी ती वाढत चालली आहे. डोक्यावर दारुचा ग्लास घेऊन नाचणाऱ्या व्यक्तिचा व्हिडियो दिपकेने शेअर केला होता. नाचणारी व्यक्ति जितेंद्र मिश्रा असल्याचा दावा मुळ व्हिडीयोमध्ये केला होता. राम मंदिराच्या सीईओ पदी नियुक्ती झाल्यानंतर दारु पिऊन केलेले सेलिब्रेशन आहे, असे या व्हिडीयोत भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा व्हिडियो फेक असून त्यातील व्यक्चि जितेंद्र मिश्रा नसल्याचे स्पष्ट झाले. लोकांनी सोशल मीडियावर लाथा घातल्यानंतर त्याने ही पोस्ट डीलीट केली.



