28.8 C
Mumbai
Sunday, October 25, 2026
घरक्राईमनामानागालँडमध्ये बनावट दारूच्या सेवनानंतर १९ जण दगावले

नागालँडमध्ये बनावट दारूच्या सेवनानंतर १९ जण दगावले

१९ जणांना अटक

Google News Follow

नागालँडमध्ये कथित बनावट दारू प्यायल्याने दोन दिवसांत तब्बल १९ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोकोकचुंग आणि तुएनसांग या दोन जिल्ह्यांमध्ये हे मृत्यू झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी तपासासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली असून, आतापर्यंत १९ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी जवळपास ३ हजार बाटल्या दारू जप्त केल्या आहेत.

माहितीनुसार, मोकोकचुंग जिल्ह्यात ८ जणांचा, तर तुएनसांग जिल्ह्यात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या सर्वांनी कथितरित्या बेकायदेशीर किंवा भेसळयुक्त दारूचे सेवन केले होते. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, दारूच्या सेवनाशी या घटनांचा संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक आय. बुंगलांग चांग यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. संशयित भेसळयुक्त दारूचा स्रोत काय होता आणि तिचा पुरवठा कुठून व कोणामार्फत करण्यात आला, याचा तपास हे पथक करणार आहे.

दरम्यान, मृत्यूंचे नेमके कारण शोधण्यासाठी दारूचे नमुने गुवाहाटी येथील प्रयोगशाळेत न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तपासात काही धागेदोरे मिळाले असून, सध्या त्याबाबत अधिक माहिती देणे घाईचे ठरेल, असे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत १९ जणांना अटक करण्यात आली असून जवळपास ३ हजार बाटल्या दारू जप्त करण्यात आली आहे. संशयित दारूची निर्मिती, वाहतूक, वितरण आणि विक्री यामागे कोण आहेत, याचा तपास सुरू आहे.

हे ही वाचा:

‘लालबागच्या राजा’ला भावपूर्ण निरोप!

जम्मू-काश्मीर विधानसभेत राडा; भाजप आमदाराला काढले बाहेर

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर

शहबाज शरीफांचा ‘विजया’चा दावा अन् भारतीय अधिकाऱ्याचे हसू

विशेष म्हणजे, नागालँडमध्ये १९९० पासून दारूबंदीचा कायदा लागू आहे. तरीही कथित बेकायदेशीर दारूच्या सेवनामुळे ही घटना घडल्याने पोलिसांनी नागरिकांना अनोळखी, लेबल नसलेली किंवा संशयास्पद दारूचे सेवन टाळण्याचे आवाहन केले आहे. दारूचे सेवन केल्यानंतर चक्कर येणे, दृष्टी धूसर होणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा शुद्ध हरपणे यासारखी लक्षणे जाणवल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी, असे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून न्यायवैद्यक अहवालानंतर मृत्यूंचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा