29 C
Mumbai
Wednesday, October 7, 2026
घरविशेषदिवेआगरच्या समुद्रात पुण्यातील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

दिवेआगरच्या समुद्रात पुण्यातील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

आळंदीतील विनर्स अॅकॅडमीतील विद्यार्थी

Google News Follow

Related

रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून सहलीसाठी आलेल्या विनर्स अॅकॅडमीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. आळंदीतील विनर्स अॅकॅडमीचे ४२ विद्यार्थी आणि दोन शिक्षक असे एकूण ४४ जणांचे पथक दिवेआगरला सहलीसाठी आले होते. मृत झालेले सर्व विद्यार्थी अकरावीच्या वर्गात शिकत होते. समुद्रकिनारी पाण्यात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. एक विद्यार्थी पाण्यात बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी इतर विद्यार्थी धावले आणि त्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याची माहिती समोर आली आहे. काही क्षणांतच आठ विद्यार्थी समुद्राच्या पाण्यात बुडाले आणि या भीषण दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
मयत मुलांची नावे खालीलप्रमाणे

1) तन्मय दत्तात्रय वहीले
2) सुमित भरत अहिरे
3) प्रणव रामदास बनसोडे
4) कैवल्य सतीश वासनकर
5) राजवीर युवराज वहीले
6) यश किरण वानखेडे
7) सोहम तुकाराम भांडवलकर
8) कौस्तुभ संदीप दौंड

दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. समुद्रात बुडालेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. महाकाली वॉटर स्पोर्ट्सच्या कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिकांनीही बचावकार्यात मदत केली. अखेर आठही विद्यार्थ्यांचे मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आले. सर्व मृतदेह बोर्ली पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले असून, पोलीस आणि प्रशासनाकडून पुढील कार्यवाही सुरू आहे. या दुर्घटनेमुळे दिवेआगर समुद्रकिनारी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सहलीसाठी आलेल्या ४४ जणांच्या पथकातील आठ विद्यार्थ्यांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
हे ही वाचा:
बोरीवली-राम मंदिरदरम्यान ४ ऑक्टोबरला चार तासांचा जम्बो ब्लॉक

इस्रायल स्मित माछर यांना विशेष पुरस्काराने गौरवणार

दिपकेंनी केली महात्मा गांधीशी स्वत:ची तुलना

कॅप्टन स्मित माछर यांना ‘विशिष्ट गुजरात गरिमा पुरस्कार’

सहलीसाठी घरातून आनंदाने निघालेल्या अकरावीच्या विद्यार्थ्यांचा अशा पद्धतीने दुर्दैवी अंत झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आळंदी परिसरातही या घटनेनंतर शोककळा पसरली आहे. समुद्रकिनारी पर्यटनासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः समुद्रात उतरताना पाण्याची खोली, समुद्राचा प्रवाह आणि सुरक्षित क्षेत्राची माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. एखादा व्यक्ती बुडताना दिसल्यास पोहता येत नसतानाही थेट पाण्यात उतरण्याऐवजी प्रशिक्षित बचाव पथकाची मदत घेणे आवश्यक आहे. दिवेआगरमधील या दुर्घटनेने आठ कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त केले असून, संपूर्ण आळंदी आणि दिवेआगर परिसरावर दुःखाचे सावट पसरले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा