32 C
Mumbai
Tuesday, October 6, 2026
घरविशेषनसीरुद्दीन शाह, जरा स्मित माछरवरही बोला ना!

नसीरुद्दीन शाह, जरा स्मित माछरवरही बोला ना!

अभिनेते, कवी पियुष मिश्रा यांचा सवालांचा भडिमार

Google News Follow

Related

अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी शिवाजी पार्क येथे झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभाग नोंदवला होता, त्यावरून त्यांना अभिनेते आणि लेखक-कवी पियूष मिश्रा यांनी सुनावले आहे.  शाह यांनी राष्ट्रीय मुद्द्यांवरही आपली भूमिका मांडावी, असे आवाहन करत मिश्रा यांनी त्यांना अनेक सवाल केले आहेत.

नसीरुद्दीन शाह यांनी शुक्रवारी मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या सीजेपीच्या आंदोलनात सहभाग घेतला होता. नुकतीच पुन्हा सक्रिय आंदोलनाच्या राजकारणात उतरलेल्या सीजेपीने या आंदोलनादरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

या आंदोलनानंतर पियुष मिश्रा यांनी समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी नसीरुद्दीन शाह यांना थेट संबोधित करत अनेक प्रश्न उपस्थित केले. पियुष मिश्रा म्हणाले, “होय, नसीर साहेब, आपल्याला माझा नमस्कार. मी पियुष मिश्रा, आपला जुना परिचित आहे. सर, नुकतीच फ्लायदुबईच्या विमानात एक दुर्घटना टळली. मिस्टर स्मित माछर यांनी आपल्या धाडसामुळे १८० जणांचे प्राण वाचवले. त्यावरही आपण काही भाष्य करा आणि त्यांचे अभिनंदन करा, सर.”

हे ही वाचा:

मुंबईत नऊ महिन्यांत ७२,८०४ घरांची विक्री

ज्ञानेशकुमारांच्या निलंबनासह निर्णयांच्या स्थगितीस ‘सुप्रीम’ नकार

भ्रष्टाचाराच्या आरोपांवर मुख्यमंत्री मान यांच्या सहाय्यकाची सीबीआय चौकशी

दादरच्या कोहिनूर बीएमसी पार्किंगचा ‘कबाडखाना’!

फ्लायदुबईच्या दुबई-तेल अवीव विमानाचे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित अलीकडेच विमानातील संभाव्य मोठी दुर्घटना टाळल्यामुळे चर्चेत आले होते.

पियुष मिश्रा यांनी लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या अलीकडील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरूनही नसीरुद्दीन शाह यांना प्रश्न विचारला. विद्यार्थी आंदोलनांबाबत शाह यांनी यापूर्वी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत मिश्रा यांनी त्यांना त्यांच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले. मिश्रा म्हणाले, “आपण म्हणत होतात की, ‘या विद्यार्थ्यांनी मला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने जेवढे शिकवले, तेवढेच शिकवले आहे.’ मला माहीत नाही की हे विद्यार्थी अभिनयाचे शिक्षक कधी झाले. आपल्याला याचा शोध लागला तर कृपया तो सर्वांसमोर सांगा.”

पियुष मिश्रा यांनी झारखंडमधील मदतकार्याच्या संदर्भात नसीरुद्दीन शाह यांच्याशी झालेल्या पूर्वीच्या संवादाचाही उल्लेख केला. त्यांनी दावा केला की, झारखंडमधील नागरिकांना मदत करण्यासाठी त्यांनी शाह यांच्याकडे मदत मागितली होती. मात्र, त्यावेळी शाह यांनी प्रत्यक्ष मदत करण्याऐवजी एका पाकिस्तानी कवीची कविता पाठवली.

मिश्रा म्हणाले, “जेव्हा मी झारखंडसाठी आपल्याकडे मदत मागितली होती, तेव्हा आपण मला एका पाकिस्तानी कवीची कविता पाठवली होती. त्यांना कविता नको होती. त्यांना पीठ, डाळी, भाकरी, गूळ, लिट्टी आणि चोखा हवा होता.” पियुष मिश्रा यांच्या या व्हिडिओवर नसीरुद्दीन शाह किंवा त्यांच्या प्रतिनिधींकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा