32 C
Mumbai
Thursday, November 26, 2026
घरविशेष२६/११ च्या हुतात्म्यांना राज्यपाल, मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

२६/११ च्या हुतात्म्यांना राज्यपाल, मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून वाहिली श्रद्धांजली

Google News Follow

मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला १८ वर्षे पूर्ण होत असताना, या हल्ल्याचा मुकाबला करताना देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूर जवानांना राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या प्रांगणातील शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी हुतात्मा जवानांना अभिवादन केले.

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षा दलातील जवानांनी दहशतवाद्यांचा धैर्याने मुकाबला केला होता. या संघर्षात अनेक जवानांनी देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या प्रांगणात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हे ही वाचा:

संविधानाचा गळा घोटणारेच लाल पुस्तकाच्या नावाने करतायत जनतेची दिशाभूल

तिजोरीत खडखडाट, तरी चर्चना ख्रिसमससाठी ३० हजार!

पाकिस्तानी कंटेंट भारतात दाखवू नका!

महापौर रितू तावडेंसह आयुक्त अश्विनी भिडेंना धमकीचा मेल

या कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार, सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री योगेश कदम, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह वरिष्ठ पोलीस व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शहीद स्मारकावर पुष्प अर्पण करून वीर जवानांच्या स्मृतींना अभिवादन केले. तसेच हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या दुःखात सहभागी होत सहवेदना व्यक्त केल्या.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा