34 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
घरअर्थजगतएक बातमी आणि अदानी समूहाचे नुकसान

एक बातमी आणि अदानी समूहाचे नुकसान

Google News Follow

Related

गेल्या वर्षभरापासून गौतम अदानी हे नाव सातत्यानं चर्चेत आहे. एका वर्षात अदानी ग्रुपचे शेअर्स इतक्या वेगानं वाढले की जगातल्या श्रीमंतांच्या यादीतही त्यांनी झपाट्यानं वरचं स्थान मिळवलं. मात्र आज शेअर बाजारात याच अदानींबद्दल एका बातमीनं संशयाचं वातावरण निर्माण केलं. पत्रकार सुचेता दलाल यांच्या ट्विटमुळे अदानी ग्रुपच्या शेअर्सना मोठा फटका बसला. पण अदानी समुहातर्फे ही बातमी तथ्यहीन असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. या बातमीमुळे अदानी ग्रुपच्या १ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

शेअर बाजारातला आजचा दिवस हा अदानी ग्रुपसाठी काळा दिवस होता. एकाच दिवसात अदानी ग्रुपचे शेअर्स ५ ते २० टक्यांनी आपटले. अदानींना हा झटका सुचेता दलाल यांच्या एका ट्विटनं बसला का याची जोरदार चर्चा ट्विटरवर सुरु झाली.

अदानी ग्रुपने एक पत्रक जरी करत असे सांगितले आहे की, इकॉनॉमिक टाइम्समध्ये आलेली सुचेता दलाल यांनी दिलेली बातमी खोटी आहे आणि अडाणी ग्रुपचे शेअर्स एनएसडीएलने रोखलेले नाहीत.

गौतम अदानी, २०२० म्हणजे कोरोना लॉकडाऊनच्या काळात जिथं सगळेजण आर्थिक नुकसानीचे आकडे मोजत होते. त्याच वर्षात या एका उद्योगपतींच्या संपत्तीत कमालीची वाढ झाली. अदानी ग्रुपचे काही शेअर्स एका वर्षात दुप्पट ते दहापट वाढले होते. पण गेल्या वर्षभरात शेअर बाजारात जबरदस्ती मुसंडी मारणाऱ्या अदानी ग्रुपच्या शेअर्स आज भूकंप झाल्यासारखे हादरले. एकाच दिवसात अदानी ग्रुपचं भांडवली बाजारातलं मूल्य तब्बल 1 लाख 3 हजार कोटी रुपयांनी कमी झालं आणि याला कारण ठरली एक बातमी.

सुचेता दलाल या देशातल्या प्रसिद्ध बिझनेस पत्रकार आहेत. १९९२ चा हर्षद मेहता घोटाळा, २००१ चा केतन पारेख घोटाळा याशिवाय एनरॉन प्रकल्पातल्या गैरव्यवहारालाही त्यांनी उजेडात आणलं होतं. त्यांच्या द स्कॅम या हर्षद मेहता घोटाळ्यावरच्या पुस्तकावर आधारित एक वेबसीरीजही नुकतीच तयार झाली होती.

हे ही वाचा:

उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती यांची पुण्यात भेट

चिराग पासवान यांना मोठा धक्का

१२ वर्षानंतर नेतान्याहू सत्तेतून बाहेर

उल्हासनगर प्रकरणी बिल्डरवर महिन्याभराने गुन्हा 

जगातल्या श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी हे १४ व्या क्रमांकावर आहेत. मागच्या एका वर्षात अदानींच्या संपत्तीत कमालीच्या वेगानं वाढ झाली. त्यांच्या ग्रुपचे शेअर्स अवघ्या एका वर्षात दहा पटीपर्यंत वाढले आहेत. काही काळासाठी त्यांनी मुकेश अंबानींनाही मागे टाकलं पण आता एका बातमीनं अदानी ग्रुपबद्दल संशयाचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे हा केवळ शेअर बाजारातला एक बुडबुडा आहे की मोठं वादळ हे लवकरच ठरेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा