27 C
Mumbai
Tuesday, August 9, 2022
घरअर्थजगतगौतम अदानींची होणार टेलिकॉम क्षेत्रात एन्ट्री?

गौतम अदानींची होणार टेलिकॉम क्षेत्रात एन्ट्री?

Related

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानींनी आता टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश करण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. अदानी समूह या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या 5 जी स्पेक्ट्रमच्या लिलावात भाग घेणार आहे. यासाठी अदानी समूहाने शुक्रवार, ८ जुलै रोजी अर्ज केला आहे.

5 जी स्पेक्ट्रमसाठी जिओ, एअरटेल, व्होडाफोन आणि अदानी समूहाने आतापर्यंत अर्ज केला आहे. अदानी समूहाला 5 जी स्पेक्ट्रम मिळाले तर त्यांचा थेट सामना मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओ व सुनिल मित्तल यांच्या भारती एअरटेल कंपन्यांशी होईल. अदानी समूहाने नुकतेच राष्ट्रीय लांब अंतर (NLD) आणि आंतरराष्ट्रीय लांब अंतर (ILD) परवाने मिळवले आहेत. दूरसंचार स्पेक्ट्रमचा लिलाव २६ जुलै रोजी सुरू होणार आहे. यामध्ये ४.३ लाख कोटींच्या एकूण ७२ हजार ९७.८५ मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रमचा लिलाव होईल.

हे ही वाचा:

राज्याच्या विकासात केंद्राचा मोठा वाटा…म्हणून पंतप्रधान मोदींची भेट

श्रीलंकेच्या पंतप्रधानांचा राजीनामा; आंदोलकांनी रानिल विक्रमसिंघेंचं खासगी घर पेटवले

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते विठुरायाची पूजा; राज्याच्या अडचणी दूर होऊन विकासासाठी साकडं

डॅशिंग IRS अधिकारी समीर वानखेडे यांचा सन्मान

भारतातील अदानी आणि अंबानी हे दोन मोठे उद्योग समूह आहेत. आतापर्यंत या दोन समूहांचा व्यवसायात कधीही थेट सामना झाला नाही. अदानींचा टेलिकॉम क्षेत्रातील प्रवेशानंतर रिलायन्स जिओला टक्कर मिळण्याची शक्यता आहे. अंबानींचा व्यवसाय तेल व पेट्रोकेमिकल्सपासून दूरसंचार व किरकोळ क्षेत्रापर्यंत पसरला आहे. तर अदानींचा बंदरांपासून कोळसा, विद्युत वितरण व उड्डयण क्षेत्रात विस्तार झाला आहे. मुकेश अंबानींच्या जिओने काही वर्षांपूर्वीच भारतीय बाजारपेठेत दमदार प्रवेश करत आपले बळकट स्थान निर्माण केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,918चाहतेआवड दर्शवा
1,924अनुयायीअनुकरण करा
15,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा