20 C
Mumbai
Monday, January 24, 2022
घरअर्थजगत'ॲपल'चे बाजारमूल्य झाले ३ ट्रिलियन डॉलर!

‘ॲपल’चे बाजारमूल्य झाले ३ ट्रिलियन डॉलर!

Related

ॲपल कंपनी ही उच्च बाजार भांडवल गाठणारी जगातील पहिली कंपनी ठरली आहे. नवीन वर्षच्या सुरुवातीलाच सिलिकॉन व्हॅली कंपनीच्या समभागांनी विक्रमी उच्चांक गाठला. त्यामुळे ॲपल कंपनी चे बाजार मूल्य कैक पटींनी वाढले. ते आता तीन ट्रिलियन डॉलर इतके झाले आहे.

कोविड-19 नंतरच्या काळात ॲपल हा एक मजबूत ब्रँड म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. ॲपलने गाठलेल्या प्रत्येक मैलाचा मानकरी स्टीव्ह जॉब्स नंतर टीम कुक हे आहेत. ॲपल या जगातील सर्वात मौल्यवान कंपनीचे बाजारमूल्य तब्बल तीन लाख कोटी डॉलर ( अंदाजे २२५ लाख कोटी रुपये ) इतके झाले आहे. तीन वर्षांपूर्वी, ॲपलने एक लाख कोटी डॉलरचा पल्ला गाठला होता.

साधारतः ४५ वर्षापूर्वी कॅलिफोर्नियातील एका गॅरेजमध्ये ॲपल कंपनी सुरू झाली होती. सध्या ॲपल कंपनी आयफोन, आयपॉड, आयपॅड एअरपॉड्स आणि एअरटॅग सारख्या मार्केट उत्पादनांवर लक्ष केंद्रित करत आहे. जरी ॲपलने या यशाचे श्रेय आयफोनला दिले तरीदेखील इतर उत्पादकांनी जसे की, मॅक, आयपॉड आणि सॉफ्टवेअर सेवांनीदेखील अलीकडील वर्षांमध्ये लक्षणीय योगदान दिले आहे.

हे ही वाचा:

अखेर आसाममध्ये सापडला बुल्ली बाई ऍपचा मास्टरमाईंड

पंजाबमध्ये मोदींचा ताफा अडवल्याचे महाराष्ट्रात पडसाद

ISIS मध्ये भर्ती होण्यास प्रवृत्त करणारे दोन दहशतवादी दोषी

तलवारीने केक कापणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

 

ॲपलच्या या यशाचे रहस्य असे की, ॲपलच्या सेवांमध्ये प्रवेश करण्यासाठी वापरकर्त्यांना ॲपलचे सदस्यता घेणे आवश्यक असल्याने त्यामूळे त्यांच्या सेवेत आणि बाजार मूल्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. तसेच, हार्डवेअर ,ऑपरेटिंग सिस्टिम आणि वापरण्यात येणारी सर्व ॲप्लीकेशन ॲपलची स्वतःची असतात. त्याशिवाय, ॲपल कधीही बाजारात उपलब्ध उत्पादकांशी स्पर्धा करीत नाहीत. कायमच स्वतःचे आगळेवेगळे उत्पादन सादर करण्यावर त्यांचा भर असतो. या अशा अनेक कारणांमुळे ॲपल कंपनी जगात श्रेष्ठ आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,588अनुयायीअनुकरण करा
5,780सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा