29 C
Mumbai
Wednesday, October 7, 2026
घरबिजनेसआंतरराष्ट्रीय बाजारात तांब्याचा भाव विक्रमी पातळीवर

आंतरराष्ट्रीय बाजारात तांब्याचा भाव विक्रमी पातळीवर

ईव्हीपासून एसी-फ्रिजपर्यंत सर्वच महागणार?

Google News Follow

Related

आंतरराष्ट्रीय बाजारात तांब्याच्या दराने विक्रमी पातळी गाठल्याने त्याचा परिणाम आता भारतातील उद्योग आणि ग्राहकांवर होण्याची शक्यता आहे. तांब्याचा भाव प्रति टन १४ हजार डॉलरच्या पुढे गेल्याने वाहन, इलेक्ट्रॉनिक्स, बांधकाम, दूरसंचार आणि विद्युत उपकरणांच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे. तांबे हा अनेक उद्योगांसाठी महत्त्वाचा कच्चा माल असल्याने त्याच्या किमतीतील वाढ थेट उत्पादन खर्चावर परिणाम करते. कंपन्यांसमोर वाढलेला खर्च स्वतःच्या नफ्यातून सहन करायचा की त्याचा भार ग्राहकांवर टाकायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

तांब्याच्या दरवाढीचा सर्वाधिक परिणाम इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. पारंपरिक पेट्रोल-डिझेल कारमध्ये साधारण २० ते २५ किलो तांबे वापरले जाते, तर इलेक्ट्रिक कारमध्ये हे प्रमाण ८० ते ८५ किलोपर्यंत असते. इलेक्ट्रिक बसमध्ये तर तब्बल २५० ते ३०० किलो तांब्याचा वापर होतो. त्यामुळे तांब्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत राहिल्यास इलेक्ट्रिक कार आणि बसच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ होऊ शकते. परिणामी वाहन कंपन्यांनी हा अतिरिक्त खर्च ग्राहकांकडून वसूल करण्याचा निर्णय घेतल्यास आगामी काळात ईव्हीच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
भारत-यूएई व्यापार २०३२ पर्यंत २०० अब्ज डॉलरवर जाण्याची शक्यता

जम्मू- काश्मीरच्या राजौरीमध्ये लष्करशी संबंधित तिघांना अटक

गुरुग्राममध्ये महिला बाईकस्वाराला धडक देणाऱ्या कल्याण बैंसलाला अटक

इमिग्रेशन न करताच तीन इटालियन नागरिक म्युनिकला रवाना

घरगुती उपकरणांनाही या दरवाढीचा फटका बसू शकतो. एसी, फ्रिज, मोटर, वायर आणि विविध इलेक्ट्रिकल उपकरणांमध्ये तांब्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे उत्पादन खर्च वाढल्यास कंपन्या एसी आणि फ्रिजच्या किमती वाढवू शकतात. काही उत्पादकांनी आधीच दरवाढीचे संकेत दिले आहेत. सणासुदीच्या काळात घरगुती उपकरणांची मागणी वाढत असताना त्याचवेळी कच्च्या मालाचा खर्च वाढल्याने ग्राहकांच्या बजेटवर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, तांब्याच्या वाढत्या किमतीचा परिणाम बांधकाम आणि शेती क्षेत्रावरही होत आहे. ट्रान्सफॉर्मर, मोटर, लिफ्ट आणि इतर विद्युत यंत्रणांच्या खर्चात वाढ होत असल्याने बांधकाम प्रकल्पांच्या एकूण खर्चावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. काही कंपन्या तांब्याला पर्याय म्हणून अॅल्युमिनियमचा वापर वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र तांब्याची मागणी आणि जागतिक पुरवठा यातील असमतोल कायम राहिल्यास आगामी काळात तांब्याची दरवाढ भारतीय उद्योगांसाठी मोठे आव्हान ठरू शकते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा