27 C
Mumbai
Saturday, October 5, 2024
घरअर्थजगतआमच्यावरील तो आरोपांचा हल्ला आणि आमचा प्रतिकार केसस्टडी बनेल!

आमच्यावरील तो आरोपांचा हल्ला आणि आमचा प्रतिकार केसस्टडी बनेल!

गौतम अदानी यांनी एक वर्ष झाल्यानंतर दिले सविस्तर स्पष्टीकरण

Google News Follow

Related

हिंडेनबर्ग अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर भारतात खळबळ उडाली होती. प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या शेअर्सवर त्याचा खूप मोठा परिणाम झाला आणि मोठे नुकसान सहन करावे लागले. या आरोपांना २५ जानेवारीला एक वर्ष झाले. त्याविषयी गौतम अदानी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

ते लिहितात, बरोबर एका वर्षापूर्वी, २५ जानेवारी २०२३ हाच तो दिवस होता, जेव्हा बातमी आली की न्यूयॉर्कमधील एका शॉर्ट-सेलरने अदाणी समूहावर झालेल्या आरोपांचे संकलन जगासमोर ऑनलाइन खुले केले आहे.

‘संशोधन अहवाल’ म्हणून प्रसिद्ध करण्यात आलेल्या त्या तथाकथित अहवालात तेच ते जुने आरोप होते . चावून चोथा झालेले तेच जुने आरोप होते, जे माझे विरोधक त्यांच्या माध्यमातील सहकाऱ्यांना हाताशी धरून त्याला संजीवनी देण्याचा प्रयत्न करीत होते. एकंदरीत आम्ही स्वतःच जाहीर केलेल्या आणि सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या माहितीमधून, निवडक अर्धसत्यांचा धूर्तपणे वापर करून हा तथाकथित संशोधन अहवाल तयार करण्यात आला होता.

आमच्यावर खोटे आणि निराधार आरोप काही नवीन नव्हते. म्हणून, सर्वसमावेशक प्रतिसाद जारी केल्यानंतर, मी याबद्दल अधिक विचार केला नाही. असे म्हणतात ज्यावेळी सत्य आपल्या बुटाच्या लेसेस बांधून बाहेर पडायच्या तयारीत असते त्यावेळी, असत्य मात्र जग पालथे घालून मोकळे झालेले असते . माझ्यासारख्या सत्याच्या ताकदीवर गाढ विश्वास असणाऱ्याला हा असत्याच्या शक्तीचा हा एक धडा होता.

शॉर्ट-सेलिंगच्या हल्ल्यांचा प्रभाव सामान्यतः वित्तीय बाजारांपुरता मर्यादित असतो. तथापि, हा एक अनोखा दुहेरी हल्ला होता – अर्थातच एक हल्ला आर्थिक क्षेत्रातून केला गेला आणि दूसरा राजकीय क्षेत्राततून करण्यात आला- हे हल्ले एकमेकांना पुरक होते. प्रसारमाध्यमांमधील काहींनी त्याला सहाय्य केले आणि त्याला हवा दिली. आमच्या विरुद्ध खोटे बोलणे आमच्या पोर्टफोलिओचे बाजारमूल्य (market cap) लक्षणीयरीत्या कमी करण्यासाठी पुरेसे होते; कारण सामान्यत: भांडवली बाजार तर्कापेक्षा भावनेवर चालतात. हजारो लहान गुंतवणूकदारांनी आपली बचत गमावली हे माझ्यासाठी अधिक दुःखदायक होते. आमच्या विरोधकांची योजना पूर्णतः यशस्वी झाली असती तर, डोमिनो इफेक्टमुळे बंदर आणि विमानतळांपासून वीज पुरवठा साखळीपर्यंत अनेक गंभीर पायाभूत क्षेत्रातील मालमत्तांना मोठी हानी पोहोचली असती. अशी स्थिती कोणत्याही देशासाठी आपत्तीजनक परिस्थिती ठरली असती. परंतु, आमचा पाया मजबूत होता. आमच्या परिचालनची (operations) ची मजबूतता आणि आमच्या वैधानिक निवेदनांची (statutory disclosures) ची उच्च गुणवत्ता यामुळे, कर्जदार, रेटिंग एजन्सींसह आणि अन्य वित्तीय संस्था या आरोपांमुमूळे प्रभावित झाले नाहीत. आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, यासाठी मनपूर्वक धन्यवाद.

हे ही वाचा:

आसाम युवक कॉंग्रेसच्या अंकिता दत्ता भाजपमध्ये प्रवेश करणार

‘त्या’ वाजुखाना परिसरात शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी द्यावी

दिल्ली: जागरण कार्यक्रमादरम्यान स्टेज कोसळला, एकाचा मृत्यू तर १७ जखमी!

काशी विश्वनाथ मंदिरासह नागर शैलीत साकारले आहे ज्ञानवापी!

ही परिस्थिती हाताळण्यासाठी आमच्याकडे पूर्वीचा अनुभव नव्हता. अखेर, आमचा आमच्या व्यवसायांच्या मजबुतीवरील विश्वास हीच आमची मुख्यतः ढाल झाली. आमचा पहिला निर्णय आमच्या गुंतवणूकदारांचे संरक्षण करण्याचा होता, २०,००० कोटी रुपयांचा एफपीओ पूर्ण केल्यानंतर, आम्ही एफपीओ मधून उभारलेली रक्कम गुंतवणूकदारांना परत करण्याचा निर्णय घेतला. कॉर्पोरेट इतिहासातील अभूतपूर्व अशा या निर्णयाने गुंतवणूकदारांचे कल्याण आणि नैतिकतेने व्यवसाय कारण्याबद्दलची आमची बांधिलकी अधोरेखित केली.

या युद्धाच्या धुक्यात, आमच्या तिजोरीत असलेला ३० हजार कोटी रुपयांचा राखीव निधी हे आमचे मुख्य शस्त्र होते आणि हा राखीव निधी वाढवून अधिकचे ४०,००० कोटी रुपये म्हणजे, पुढील दोन वर्ष कर्ज परतफेडीसाठी लागणारी रक्कम, आम्ही जागतिक स्तरावर पत असलेल्या गुंतवणूकदारांना आमच्या कंपन्यांचे समभाग विकून जसे की जीकूजी पार्टनर्स आणि कतार इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटी उभी केली . यामुळे राखीव निधीची एक ढाल तयार करणे, बाजारपेठेत आमच्या समूहाबद्दल विश्वास निर्माण करणे आणि भारतासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करत राहणे ही उद्दिष्टे पूर्ण झाली.

मार्जिन-लिंक्ड फायनान्सिंगचे १७,५०० कोटी रुपयांचे प्री-पेमेंट करून, आम्ही आमच्या पोर्टफोलिओला बाजारातील अस्थिरतेपासून रोखले. मी माझ्या लीडरशिप टीमला व्यवसायांच्या परिचालनावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. यामुळे वित्त वर्ष २४ च्या पहिल्या सहामाहीत समूहाच्या व्याज, घसारा आणि करपूर्व (इबीडीता) उत्पन्नात ४७% ची विक्रमी वाढ झाली, अदानी पोर्टफोलिओने वित्त वर्ष २४ च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक-त्रैमासिक नफा नोंदवला, आमची कामगिरी बोलत होती.

आम्ही आमच्या आर्थिक आणि गैर-आर्थिक भागधारकांठी एक व्यापक प्रतिबद्धता कार्यक्रम राबविला. एकट्या फायनान्स टीमने सुरुवातीच्या १५० दिवसांत जगभरातील जवळपास ३०० बैठका घेतल्या आणि नऊ रेटिंग एजन्सींद्वारे १०४ संस्थांना रेटिंगची खात्री करून दिली. बँका, निश्चित उत्पन्न गुंतवणूकदार, सार्वभौम संपत्ती निधी, समभाग गुंतवणूकदार, जेव्ही भागीदार आणि रेटिंग एजन्सी हे नेहमीच आमचे मुख्य भागधारक राहिले आहेत, कारण त्यांनी केलेल्या परीक्षण, छाननी आणि पुनरावलोकने आमच्या व्यापक आणि पारदर्शक वैधानिक निवेदन पद्धतीवर शिक्कमोर्तबत केले.

ज्यांनी आमच्यावर हल्ला केला त्यांच्या हेतूंचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही वस्तुस्थिती पारदर्शकपणे मांडण्यावर आणि आमची बाजू कथन करण्यावर लक्ष केंद्रित केले. यामुळे आमच्या समूहाविरुद्धच्या नकारात्मक मोहिमांचा प्रभाव कमी होत गेला. एफपीओ चे प्राथमिक लक्ष्य हे आमच्या समूहाची समभाग धारक संख्या वाढवणे हा होता आणि आमच्या प्रयत्नांमुळे समभागधारकांचा पाया ४३% ने वाढला आणि जवळपास ७० लाखांपर्यंत पोहोचला.

याव्यतिरिक्त, आम्ही आमच्या वाढीचा वेग राखण्यासाठी वचनबद्ध राहिलो. समूहाने आपली गुंतवणूक चालू ठेवली, ज्याचा पुरावा म्हणजे आमच्या मालमत्तांचे मूल्य ४.५ लाख कोटी रुपये झाले आहे. या कालावधीत खवदा येथील जगातील सर्वात मोठी अक्षय ऊर्जा निर्मिती प्रकल्प, नवीन कॉपर स्मेल्टर, ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टम आणि धारावीचा बहुप्रतिक्षित पुनर्विकास यासह अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची सुरुवात झाली आहे.

या संकटाने आमच्या समूहातील एक मूलभूत कमकुवत दुवा उघड केला, ज्याच्याकडे मी दुर्लक्ष केले होते, – आम्ही आमच्या लोकांपर्यंत पोहचण्याचा यंत्रणेकडे पुरेसे लक्ष दिले नव्हते. अदाणी समूहाने काय केले किंवा करत आहे त्याचा आकार, प्रमाण आणि दर्जा याची माहिती पायाभूत सुविधा उद्दोगाना अर्थ साहाय्य पुरवणारी वर्गाच्या बाहेरील मोजक्या लोकांना माहीत होता. आम्हाला असे उगाचच वाटत होते की सर्व गैर-आर्थिक भागधारक देखील आमच्याबद्दलचे सत्य जाणून आहेत – त्यांना हे माहिती आहे कीजे आमची आर्थिक स्थिती मजबूत आहे, आमचा प्रशासकीय प्रणाली निर्दोष आहे, आमचा विकासाचा रोडमॅप योग्य आहे आणि भारतातील महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आम्ही महत्त्वाची भूमिका बजावतो, यावर आमचा पूर्णपणे विश्वास होता.

या अनुभवाने आमच्या गैर-आर्थिक भागधारकांशी प्रभावीपणे सोबत घेण्याची गरज अधोरेखित केली. आम्ही आमच्या कर्जाच्या कथित धोकादायक पातळीच्या कथांचा आणि निराधार राजकीय आरोपांचा प्रतिकार करण्यात अयशस्वी झालो, परिणामी गैरसमज जास्त पसरला. वस्तुस्थिती अशी आहे की, आमच्या परिवहन आणि उपयोगिता (utility) कंपन्यांचे उत्पन्नाशी असलेले कर्जाशी असलेले गुणोत्तर सर्वात कमी आहे. (सप्टेंबर २०२३ ला संपलेल्या अर्ध्या वर्षासाठी, हे २.५x होते.) तसेच, विविध राजकीय पक्षांद्वारे शासित २३ राज्यांमध्ये आमचा पायाभूत सुविधांचा व्यवसाय पसरलेला असून, तेथील राजकारणाशी आमचा काहीही संबंध नाही.

गेल्या वर्षभरातील कसोटीच्या प्रसंगांनी आणि संकटांनी आम्हाला मौल्यवान धडे दिले आहेत, त्यांनी आम्हाला मजबूत केले आहे आणि भारतीय संस्थांवरील आमचा विश्वास पुन्हा दृढ केला आहे. आमच्यावरचा हा कुटिल हल्ला – आणि आमचा जोरदार प्रतिकार – हे निःसंशयपणे केस स्टडी बनतील, तरीही मी काय शिकलो हे सर्वांसमोर मांडणे भाग पडले कारण, आज आम्ही लक्ष्य होतो, उद्या कोणी इतर असू शकते. अशा हल्ल्यांचा हा शेवट आहे या भ्रमात मी नाही. मला विश्वास आहे की आम्ही या अनुभवातून आणखी मजबूत झालो आहोत आणि भारताच्या विकासाच्या कथेत आमचे योगदान चालू ठेवण्याच्या आमचा संकल्प अधिक दृढ झाला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
180,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा