भारताच्या परकीय चलनसाठ्यात (Forex Reserves) पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ३ जुलै २०२६ रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलनसाठा तब्बल ७.२६ अब्ज डॉलरने वाढून ६७४.१९ अब्ज डॉलर इतका झाला आहे. याआधीच्या आठवड्यात हा साठा ६६६.९३ अब्ज डॉलरवर घसरला होता.
या वाढीमध्ये सर्वाधिक वाटा Foreign Currency Assets (FCA) चा आहे. एफसीएमध्ये ४.५१ अब्ज डॉलरची वाढ होऊन तो ५४५.५८ अब्ज डॉलर झाला. तसेच देशाच्या सोन्याच्या साठ्याचे मूल्य २.६६९ अब्ज डॉलरने वाढून १०५.२० अब्ज डॉलर इतके झाले आहे. याशिवाय स्पेशल ड्रॉइंग राइट्स (SDR) १८.६२ अब्ज डॉलर, तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतील (IMF) भारताची राखीव स्थिती ४.७८७ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
हे ही वाचा:
ठाण्यातील प्रसिद्ध फूड आउटलेटवर FDA ची धडक कारवाई !
स्पेनचा सेमीफायनलमध्ये दिमाखदार प्रवेश
आषाढी वारी हायटेक! संपर्कासाठी प्रथमच ‘बीबीपीपीडीआर’ प्रणाली
प्रेयसीवर संशयातून प्रियकराने केली निर्घृण हत्या
आरबीआयने स्पष्ट केले की, रुपयामध्ये अनावश्यक चढ-उतार होऊ नयेत यासाठी परकीय चलन बाजारावर सातत्याने लक्ष ठेवले जात असून आवश्यकतेनुसार हस्तक्षेप केला जातो. मजबूत परकीय चलनसाठ्यामुळे आयात खर्च भागवण्याची क्षमता वाढते, रुपयाला आधार मिळतो आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या काळात भारताची आर्थिक स्थिती अधिक भक्कम राहण्यास मदत होते







