30 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
घरअर्थजगतगुंतवणूकदारांना एलआयसीने केले निराश

गुंतवणूकदारांना एलआयसीने केले निराश

Google News Follow

Related

अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मंगळवार, १७ मे रोजी सरकारची विमा कंपनी एलआयसी शेअर बाजारात सूचिबद्ध झाली. मात्र, सूचिबद्ध होताच एलआयसीच्या भागधारकांना एलआयसीने निराश केले आहे.

एलआयसीचा शेअर आज सूचिबद्ध झाला असताच मोठ्या घसरणीसह ८६२ वर सुरु झाला. त्यांनतर खरेदीदारांची संख्या वाढल्याने काही काळासाठी एलआयसी शेअर ने ९०३ वर ट्रेड केले. मात्र, ज्या उत्सुकतेने गुंतवणूकदार एलआयसी शेअर्सची वाट पाहत होते त्यांचा हिरमोड झाला आहे. प्री-ओपनमध्ये, एलआयसीच्या स्टॉकने पहिल्या दिवसाची सुरुवात १२.६० टक्क्यांनी म्हणजेच ११९.६० रुपयांच्या तोट्यासह ८२९ रुपयांवर केली आहे.

एलआयसीचा आलेला आयपीओ भारताच्या आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ असल्याचे सिद्ध झाले आहे. या आयपीओसाठी किंमत ९०२-९४९ रुपये निश्चित करण्यात आली होती. प्रथमच, आठवड्याच्या शेवटी शनिवार आणि रविवारी दोन्ही दिवशी आयपीओ खुला राहिला होता. विक्रमी सहा दिवस खुल्या असलेल्या एलआयसीच्या आयपीओला जवळपास प्रत्येक श्रेणीत चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र आज सूचिबद्ध झाल्यांनतर पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तोटा होण्याची चिन्हे दिसत आहेत.

हे ही वाचा:

१९९३च्या मुंबई साखळी स्फोट प्रकरणी चौघे अटकेत

माथेरानमध्ये आता धावणार ई- रिक्षा

वुमन्स टी-२० चॅलेंजसाठी तीन संघ या दिवसापासून मैदानात उतरणार

कराची स्फोटाने पुन्हा हादरले; एका महिलेचा मृत्यू

दरम्यान, शासकीय विमा कंपनीचा लिस्टिंग सोहळा सकाळी ८.४५ वाजता सुरू झाला होता. बीएसईचे सीईओ आणि एमडी आशिष कुमार चौहान, डीआयपीएएमचे सचिव तुहिन कांत पांडे यांच्यासह एलआयसीचे सर्व अधिकारी सूचीकरण समारंभात उपस्थित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा