27 C
Mumbai
Saturday, June 25, 2022
घरविशेषमाथेरानमध्ये आता धावणार ई- रिक्षा

माथेरानमध्ये आता धावणार ई- रिक्षा

Related

मुंबईपासून जवळ असलेलं पर्यटनस्थळ माथेरान येथे लवकरच आता ई- रिक्षा सुरू होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने माथेरान या पर्यटनस्थळी ई- रिक्षा सुरु करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. तसेच पुढील तीन महिन्यांत ई-रिक्षाची ट्रायल घेण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

मुंबईपासून काहीच किलोमीटर अंतरावर असलेल्या माथेरानमध्ये जगभरातून पर्यटक येत असतात. माथेरान येथे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना ये- जा करण्यासाठी पायी मार्ग, हातरिक्षा आणि घोडे याशिवाय पर्याय नाही. या अमानवी वाहतुकीविरोधात पर्यावरण मित्र सुनील शिंदे यांनी दहा वर्षे न्यायालयीन लढा दिला. अखेर सर्वोच्च न्यायालयानं ई-रिक्षाला हिरवा कंदील दाखवला आहे.

हे ही वाचा:

वुमन्स टी-२० चॅलेंजसाठी तीन संघ या दिवसापासून मैदानात उतरणार

कराची स्फोटाने पुन्हा हादरले; एका महिलेचा मृत्यू

अमृता फडणवीस म्हणाल्या, वजनदार ने हलके को…

दहशतवादी संघटनेकडून काश्मिरी पंडितांना धमकीचे पत्र

माथेरान येथील जंगल आणि पर्यावरणाला कार्बन डाय- ऑक्साइडमुळे बाधा येऊ नये. त्यामुळे पर्यावरण मित्र सुनील शिंदे यांच्या नेतृत्वात येथे ई- रिक्षाची मागणी सुरू होती. न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रशासकीय कारवाई पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करून ई- रिक्षाचा ट्रायलसाठी प्रयत्न करू अशी माहिती माथेरान नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,938चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
10,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा