29 C
Mumbai
Monday, June 27, 2022
घरविशेषवुमन्स टी-२० चॅलेंजसाठी तीन संघ या दिवसापासून मैदानात उतरणार

वुमन्स टी-२० चॅलेंजसाठी तीन संघ या दिवसापासून मैदानात उतरणार

Related

देशभरात सध्या इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलचा उत्साह असताना क्रिकेट रसिकांसाठी अजून एक खुशखबर आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वुमन्स टी-२० चॅलेंज सामन्यांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या स्पर्धेत तीन महिला संघ आपापसात भिडणार आहेत.

बीसीसीआयने महिलांच्या टी-२० चॅलेंज सामन्यांसाठी सघांची घोषणा केली असून तारखाही जाहीर केल्या आहेत. सुपरनोवाज, ट्रेलब्लॅझर्श आणि व्हेलॉसिटी असे तीन संघ मैदानात उतरणार आहेत. २३ मे ते २८ मे या कालावधित हे सामने खेळवले जाणार आहेत.

हे ही वाचा:

कराची स्फोटाने पुन्हा हादरले; एका महिलेचा मृत्यू

आसाममध्ये पावसाचा हाहाकार; २ लाख लोकांना पुराचा फटका

दहशतवादी संघटनेकडून काश्मिरी पंडितांना धमकीचे पत्र

फडणवीसांनी ठोकले!

सुपरनोवाज संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे, ट्रेलब्लॅझर्स संघाचे नेतृत्व स्मृती मंधाना आणि व्हेलॉसिटी संघाची धुरा दिप्ती शर्माकडे सोपवण्यात आली आहे. मात्र, यंदा मिताली राज, झुलन गोस्वामी यांच्यासरख्या दिग्गज खेळाडूंचा महिला टी-२० चॅलेंज २०२२ सामन्यांमध्ये समावेश करण्यात आलेला नाही.

सुपरनोवाज संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), तानिया भाटिया (उपकर्णधार), अलाना किंग (परदेशी खेळाडू), आयुष सोनी, चंदू वी, डिआंद्रा डॉटिन (परदेशी खेळाडू), हरलीन देओल, मेघना सिंग, मोनिका पटेल, मुस्कान मलिक, पूजा वस्त्राकर, प्रिया पुनिया, राशी कनोजिया, सोफी एक्लेस्टोन (परदेशी खेळाडू), सुने लुस (परदेशी खेळाडू), मानसी जोशी

ट्रेलब्लेझर्स संघ
स्मृती मानधना (कर्णधार), पूनम यादव (उपकर्णधार), अरुंधती रेड्डी, हेली मॅथ्यूज (परदेशी खेळाडू), जेमिमाह रॉड्रिग्स, प्रियंका प्रियदर्शिनी, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग, रिचा घोष, एस. मेघना, सायका इशाक, सलमा खातून (परदेशी खेळाडू), शरमीन अख्तर (परदेशी खेळाडू), सोफिया ब्राउन (परदेशी खेळाडू), सुजाता मल्लिक, एस.बी.पोखरकर

व्हेलॉसिटी संघ
दीप्ती शर्मा (कर्णधार), स्नेह राणा (उपकर्णधार), शफाली वर्मा, अयाबोंगा खाका (परदेशी खेळाडू), केपी नवगिरे, कॅथरीन क्रॉस (परदेशी खेळाडू), कीर्ती जेम्स, लॉरा वोल्वार्ड (परदेशी खेळाडू), माया सोनवणे, नत्थकन चंथम (परदेशी खेळाडू), राधा यादव, आरती केदार, शिवाली शिंदे, सिमरन बहादूर, यस्तिका भाटिया, प्रणवी चंद्रा

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,937चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
11,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा