27.9 C
Mumbai
Tuesday, July 15, 2025
घरअर्थजगतगुंतवणुकीच्या दुनियेतील किमयागार...

गुंतवणुकीच्या दुनियेतील किमयागार…

मोतीलाल ओसवाल यांनी भारतात ‘फायनान्शियल लिटरेसी’चा झेंडा उंचावला

Google News Follow

Related

प्रशांत कारुळकर

भारताच्या शेअर बाजाराबाबत जेव्हा केव्हा चर्चा होते, तेव्हा काही मोजकी नावे समोर येतात. अशी नावे, ज्यांनी इतिहास घडवलेला आहे. मोतीलाल ओसवाल हे त्यापैकीच एक लखलखीत झळाळी असलेले नाव.

मध्यमवर्गीय आर्थिक परिस्थिती असलेल्या घरात मोतीलाल यांचा जन्म झाला. पुढे मेहनत, अभ्यास आणि दूरदृष्टीच्या बळावर त्यांनी अविश्वसनीय मजल मारली. “मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस” ची स्थापना केली.  गेली अनेक वर्षे मी त्यांच्या वाटचालीचे बारकाईने निरीक्षण करतो आहे.

मोतीलाल यांचा जन्म राजस्थानमधील एका अत्यंत साध्या कुटुंबात झाला. शिक्षणासाठी त्यांनी मुंबई गाठली. वयाच्या २४व्या वर्षी ते चार्टर्ड अकाउंटंट झाले. एका शेअर ब्रोकरेज फर्ममध्ये त्यांनी नोकरी केली. नोकरी करणं हे त्यांच्या आयुष्याचे उद्दिष्ट कधीच नव्हतं. काहीतरी वेगळं करण्याचा ध्यास घेत त्यांनी १९८७ साली रामदेव अग्रवाल यांच्यासोबत भागीदारीत “मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस”ची स्थापना केली.

गुणवत्ता, संशोधन आणि विश्वास…

“ब्रोकरेज पेक्षा रिसर्च महत्त्वाचा” हा विचार त्यांनी खूप आधी स्वीकारला. त्यांनी कंपनीला एक रिसर्च-ड्रिव्हन फर्म बनवले. त्यांच्या म्हणण्यानुसार, “गुंतवणूक म्हणजे व्यवसायात भागीदारी – भावनिक नव्हे, बौद्धिक व्यवहार”.

१९९५ मध्ये त्यांनी “QGLP” – Quality, Growth, Longevity, Price या तत्वावर आधारित गुंतवणुकीचा मूलमंत्र दिला. याच सिद्धांतावर त्यांनी अनेक कंपन्यांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करून मोठा फायदा मिळवला.

त्यांनी IPO, Mutual Fund, Wealth Management, Private Equity अशा अनेक सेवा क्षेत्रांमध्ये कंपनीचा विस्तार केला. मोतीलाल ओसवाल यांचे गुंतवणुकीविषयीचे विचार हे अत्यंत सुस्पष्ट आणि ठाम आहेत. त्यांनी कधीही शॉर्ट टर्म ट्रेडिंगचा पुरस्कार केला नाही. त्यांचं तत्त्वज्ञान हे “Buy Right, Sit Tight” या चार शब्दांत मांडलेलं आहे. Buy Right म्हणजे अशा कंपन्या निवडा ज्या गुणवत्ता, व्यवस्थापन व दीर्घकालीन वाढ यासाठी ओळखल्या जातात. Sit Tight म्हणजे त्या शेअर्सना दीर्घकाळ टिकवून ठेवा – संयम ठेवून मूल्य वृद्धीची वाट पाहा.

पुरस्कार आणि सन्मान…

 

ओसवाल यांना अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले.

आंतरराष्ट्रीय मनी मार्केट्स अ‍ॅवॉर्ड – “बेस्ट ब्रोकरेज हाऊस”

CNBC–TV18 चा “आयकॉनिक बिझनेस लीडर” पुरस्कार

BSE आणि D&B द्वारे ‘लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड’

 

ते केवळ एक यशस्वी उद्योजक नाहीत, तर समाजऋण फेडण्यासाठी कटिबद्ध असलेले व्यक्तिमत्त्व आहेत. ‘मोतीलाल ओसवाल फाउंडेशन’ मार्फत त्यांनी, ग्रामीण शिक्षण, स्त्री सक्षमीकरण, कौशल्य विकास या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे. वैयक्तिक आयुष्यात ते अत्यंत साधे, नम्र आणि अध्यात्मिक आहेत. सनातन धर्माचे अभिमानी आहेत. नियमित योग, ध्यान साधना आणि हिंदू तत्त्वज्ञान हे त्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक आहेत.

हे ही वाचा:

तंत्रज्ञान, विविध योजनांमुळे कृषिक्षेत्राला मिळाले नवचैतन्य

उत्तर प्रदेश पोलिसांनी ८ वर्षांत २३४ अट्टल गुन्हेगारांना धाडले यमसदनी

डॉ. केशव बळीराम हेडगेवार; राष्ट्रभक्ती, शिस्त आणि आत्मबलिदानाचे प्रतीक

इस्रायल-इराण संघर्षात अमेरिका सामील होणार?, ट्रम्प दोन आठवड्यात घेणार निर्णय!

ते नेहमी म्हणतात की, “जास्त कमवण्याचा विचार करण्यापेक्षा  शहाणपणाने गुंतवण्याचा विचार महत्त्वाचा.” त्यांचं आयुष्य हे तरुण उद्योजक आणि गुंतवणूकदारांसाठी एक आदर्श आहे. शिस्त, संयम, मूल्याधारित दृष्टिकोन आणि सातत्य हेच त्यांचे मूलमंत्र आहेत. त्यांचे मोठेपण सांगताना कदाचित माझे शब्द थिटे पडतील म्हणून काही महनीय व्यक्तिमत्व त्यांच्याबद्दल काय म्हणतात, हे सांगणे मला आवश्यक वाटते.

स्वर्गीय राकेश झुनझुनवाला ज्यांना भारताचे वॉरेन बफे म्हणून ओळखलं जाते, ते  म्हणायचे, “मोतीलाल ओसवाल हे नाव म्हणजे भारतीय गुंतवणूक क्षेत्रात प्रामाणिकतेचे दुसरे नाव आहे. त्यांनी ‘Buy Right, Sit Tight’ ह्या विचाराने लाखो गुंतवणूकदार घडवले.  देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अगदी मोजक्या शब्दात मोतीलालजींचे मोठेपण अधोरेखित केलेले आहे. “मोतीलाल ओसवाल यांच्यासारख्या लोकांनी भारतात ‘फायनान्शियल लिटरेसी’चा झेंडा उंचावला आहे. ते केवळ उद्योगपती नाहीत, ते विचारवंत आहेत.”

अशा अनेक लोकांनी मोतीलाल ओसवाल यांच्या कर्तुत्वाबद्दल भरभरून सांगितले आहे त्यांच्यापेक्षा वेगळे सांगण्यासारखे माझ्याकडे फार नाही. मोतीलाल ओसवाल हे अशा अनेक तरुणांचे आदर्श आहेत, जे त्यांच्या पाऊलखुणांवर चालण्याचा प्रयत्न करत असतात. ही संख्या निश्चितपणे वाढत जाणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
256,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा