पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाच्या दौऱ्यावर असताना अमेरिकेत आमंत्रित केले होते पण मोदींनी त्याला नकार दिला, त्यावरून मोदींनी ओडिशा येथे झालेल्या भाषणात आपली भूमिका स्पष्ट केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ओडिशा दौऱ्यावर असून त्यांनी तिथे सभेत बोलताना सांगितले की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन भेटीचे आमंत्रण दिले होते, पण त्यांनी ते नम्रतेने नाकारले कारण त्यांना “पवित्र महाप्रभूंच्या भूमीत परत यायचे होते.”
हे ही वाचा:
ट्रम्प देणार पाकिस्तानला एफ-३५?
महाराष्ट्र रेडिओ महोत्सवात पाच आर.जे घेणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत
आसाममध्ये मुस्लिम देशातील ५ हजार मीडिया अकाऊंट्स कार्यरत!
एअर इंडिया अपघातातील २२० डीएनए नमुने जुळले; २०२ मृतदेह कुटुंबीयांना सोपवले
भुवनेश्वरमध्ये जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ते जेव्हा कॅनडामधील G7 शिखर परिषदेला गेले होते, तेव्हा त्यांना ट्रम्प यांचा फोन आला. ट्रम्प यांनी त्यांना वॉशिंग्टनमध्ये रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रण दिले, जे मोदींनी सौम्यपणे नाकारले.
मोदी म्हणाले, केवळ दोन दिवसांपूर्वी मी कॅनडामध्ये G7 शिखर परिषदेसाठी गेलो होतो. तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी मला फोन केला आणि म्हटले, तुम्ही कॅनडाला आला आहात, तर वॉशिंग्टनमार्गे जा, आपण एकत्र जेवण करू आणि चर्चा करू.’ त्यांनी खूप आग्रहाने मला आमंत्रण दिले. मी त्यांना सांगितले, ‘आपल्या निमंत्रणाबद्दल धन्यवाद, पण माझ्यासाठी महाप्रभूंच्या भूमीत परत जाणे खूप महत्त्वाचे आहे.’ म्हणून मी ते आमंत्रण सौम्यपणे नाकारले. आणि तुमचे महाप्रभूंवरील प्रेम आणि श्रद्धा मला या भूमीत घेऊन आली आहे.”
ओडिशामधील दौऱ्याचा उद्देश
पंतप्रधान मोदी हे ओडिशामध्ये भाजप सरकारच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले आहेत. जून २०२४ मध्ये राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्यापासून मोदी यांची ही सहावी ओडिशा भेट आहे.
या दौऱ्यात पंतप्रधानांनी १८६०० कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या १०५ विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले, तसेच “ओडिशा व्हिजन डॉक्युमेंट” देखील सादर केले.
उद्घाटन करण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये खालील बाबींचा समावेश होता
पिण्याच्या पाण्याचे आणि सिंचन प्रकल्प
आरोग्य सेवा पायाभूत सुविधा
ग्रामीण रस्ते आणि पुल
राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे प्रकल्प