केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवार, १ फेब्रुवारी रोजी सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रावर विशेष लक्ष देत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. विशेषतः आयुर्वेद, फार्मा, डिझाईन, तांत्रिक शिक्षण आणि विद्यार्थी सुविधांवर सरकारने विशेष भर दिला आहे.
अर्थसंकल्पामध्ये आयुर्वेद शिक्षणाला चालना देण्यासाठी विशेष घोषणा करण्यात आली असून देशात तीन नवीन आयुर्वेद संस्था स्थापन केल्या जाणार आहेत. यासोबतच औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी ड्रग टेस्टिंग लॅब्स सुधारीत केल्या जाणार आहेत. त्यामुळे आयुर्वेद शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा मिळतील आणि या क्षेत्रातील प्रशिक्षित डॉक्टर्सची संख्या लक्षणीयरीत्या वाढेल.
देशात पाच नव्या यूनिव्हर्सिटी टाऊनशिपचा विकास करण्यात येणार असून या टाऊनशिपमध्ये अभ्यास, संशोधन, हॉस्टेल, खेळ आणि स्टार्टअपसारख्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असतील. त्यामुळे उच्च शिक्षणापर्यंत पोहोच सुलभ होईल आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये नवीन अभ्यास आणि शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील.
हे ही वाचा:
नारळ, काजू, कोको, अक्रोड आणि शेंगदाण्याला प्रोत्साहन
भारतातील ‘ग्रोथ शहरां’ना जोडण्यासाठी सात हाय- स्पीड रेल कॉरिडोर
भारताच्या सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स इकोसिस्टमला मिळणार गती; ४०,००० कोटींची तरतूद
कर्तव्य भवनात तयार करण्यात आलेला ‘तीन’ कर्तव्यांवर आधारित अर्थसंकल्प!
डिजिटल आणि सर्जनशील कौशल्यांना चालना देण्यासाठी सरकारने ABGC कंटेंट क्रिएटर लॅब सुरू करण्याची योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत, IIT मुंबईच्या सहकार्याने देशातील १५,००० माध्यमिक शाळा आणि ५०० महाविद्यालयांमध्ये अशा लॅब्स स्थापन केल्या जातील. या लॅब्समध्ये विद्यार्थी डिजिटल कंटेंट, गेमिंग, अॅनिमेशन आणि नवीन तंत्रज्ञानाशी संबंधित कौशल्ये शिकू शकतील. यासोबतच, अर्थमंत्री यांनी उच्च शिक्षण संस्थांसाठी प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी हॉस्टेल उभारण्याचीही घोषणा केली आहे.







