मुंबईतील वांद्रे पूर्व भागात असलेल्या ‘गरीब नगर’ झोपडपट्टी परिसरात मंगळवार, १९ मे रोजी अनधिकृत बांधकामांविरुद्ध मोहीम सुरू झाली. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पश्चिम रेल्वेने ही पाडकाम मोहीम हाती घेतली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून दुसऱ्या दिवशी (२० मे) ही कारवाई सुरू होती. यावेळी या भागात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
या दगडफेकीत १० जखमी झाले आहेत. त्यात दगडफेक करणारे आणि पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे.
रेल्वेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला स्थानिकांनी विरोध करत संताप व्यक्त केला. यामुळे या परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. यावेळी काही जणांनी पोलिसांच्या दिशेने बाटल्या फेकल्या तर काही महिलांनी पोलिसांवर पाणी फेकत बादल्या फेकल्याच्या घटनाही घडल्या. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. या ठिकाणची गर्दी पाहता पोलिसांनी आता अधिकची कुमक मागवली आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी ही अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू आहे. दरम्यान, स्थानिक तरुणांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचीही घटना घडली. यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा लाठीचार्ज करत काही तरुणांना ताब्यात घेतले आहे.
रेल्वे मालमत्तेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून करण्यात आलेल्या पाडकाम कारवाईदरम्यान हा प्रकार घडला. जमावाकडून झालेल्या दगडफेकीत ३ आंदोलक आणि ३ पोलीस कर्मचारी जखमी झाले.
➡ जखमींबाबत भाभा हॉस्पिटलकडून यांच्याकडून प्राप्त माहिती:
एकूण ६जखमी नोंदवले गेले
पोलीस कर्मचारी
विपुल विजयकुमार कदम, पुरुष/३९, DAMA
मनीष भीमराव बच्छाव, पुरुष/, DAMA
वैभव गीते, पुरुष/२५, DAMA, आंदोलक
फिझान अनवज खान, पुरुष/२२ वर्षे, आंदोलक, DAMA
ए. रशीद खान, पुरुष/१७ वर्षे, आंदोलक, DAMA
अन्सार अली बेग, पुरुष/४९ वर्षे, रुग्णालयात दाखल, आंदोलक, प्रकृती स्थिर
….
संबंधित देसाई हॉस्पिटलकडून प्राप्त माहिती:
एकूण 4 जखमी नोंदवले गेले : सर्व पोलीस कर्मचारी
जितेंद्र कुमार सतेंदर, पुरुष/45 वर्षे, रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर
नवनाथ अण्णा मुदगुळ, पुरुष/45 वर्षे, DAMA
ओमकार दीपक कोळी, पुरुष/39 वर्षे, DAMA
चंद्रकांत धांबळे, पुरुष/45 वर्षे, DAMA
मुंबई उच्च न्यायालयाने ६ मे रोजी झालेल्या एका महत्त्वपूर्ण सुनावणीत पश्चिम रेल्वे प्रशासनाला ही पाडकाम मोहीम पुढे नेण्याची रीतसर परवानगी दिली होती. मात्र, अतिक्रमण हटवताना न्यायालयाने महत्त्वाची अटही प्रशासनावर घातली आहे. २०२१ मध्ये प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या अधिकृत सर्वेक्षणात जे झोपडपट्टीधारक ‘पात्र’ ठरले आहेत, त्यांच्या राहत्या घरांचे आणि अधिकारांचे संरक्षण करणे प्रशासनावर बंधनकारक असणार आहे. त्यामुळे या कारवाईत केवळ अनधिकृत आणि अपात्र ठरलेल्या बांधकामांवरच बुलडोझर चालवला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे ही वाचा:
इराण संघर्षात अमेरिकेच्या ४२ लढाऊ विमानांचे नुकसान
२०२१ हिंसाचारप्रकरणी तृणमूल नगरसेवक देबराज चक्रवर्ती पोलिसांच्या ताब्यात
पंतप्रधान मोदींकडून मेलोनी यांना ‘मेलोडी’ची भेट
पंतप्रधान मोदींना ‘गारुडी’ दाखवून नॉर्वेच्या वृत्तपत्राने ओलांडल्या मर्यादा
पश्चिम रेल्वेच्या मालकीच्या जागेवर उभी राहिलेली बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यासाठी सलग पाच दिवस ही धडक कारवाई चालणार आहे. १९ मे ते २३ मे या कालावधीत चालणाऱ्या या व्यापक मोहिमेला मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिल्यानंतरच पश्चिम रेल्वेने हे अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेच्या मालकीच्या मोक्याच्या जागांवर बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करून या वस्त्या उभ्या राहिल्या होत्या. रेल्वेचे प्रकल्प आणि सुरक्षितता लक्षात घेता या जागा मोकळ्या करणे अत्यंत गरजेचे बनले होते.







