28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरक्राईमनामापवई दगडफेक प्रकरणी २००जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पवई दगडफेक प्रकरणी २००जणांविरुद्ध गुन्हा दाखल

३०० ते ३५० जणांचा जमाव गोळा झाला

Google News Follow

Related

पवई दगडफेक प्रकरणी पवई पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी २००हुन अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून २५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या दगडफेकीच्या घटनेत पोलीसासह २५ जण जखमी झाले असून त्यात सहायक पोलिस आयुक्त भरत सूर्यवंशी यांचा समावेश आहे. ताब्यात घेण्यात आलेल्याना अटकेची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पवईतील जय भीम नगर या ठिकाणी असलेल्या झोपड्यावर कारवाई करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी, कर्मचारी पोलिसांच्या बंदोबस्तात गुरुवारी सकाळी जयभीम नगर येथे दाखल झाले.अतिक्रमण विभागाच्या अधिकारी यांनी येथील नागरिकांना झोपड्या खाली करण्यास सांगितले. येथील ३०० ते ३५० जणांचा जमाव गोळा झाला, त्यात मोठ्या प्रमाणात महिला आणि तरुणाचा मोठा सहभाग होता. संतप्त जमावाने या कारवाईला विरोध करण्यास सुरुवात केली. दरम्यान बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी या संतप्त जमावाला शांत राहण्याचा व सरकारी कामात अडथळा आणू नका असे समजाविण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा:

जेडीयूचा ‘एक राष्ट्र, एक मतदान’ आणि समान नागरी कायद्याला पाठिंबा!

विशालने विझवली मशाल, खर्गेंना दिले पाठिंब्याचे पत्र!

सुवर्ण मंदिरात खलिस्तानी समर्थनार्थ घोषणा

दिल्लीत मुस्लिम मते विरोधात तरीही भाजपाच सरस!

परंतु संतप्त झालेल्या जमावाने अतिक्रमण विरोधी पथकावर आणि पोलिसांवर दगडफेक सुरू केली,या दगडफेकीत सहाय्यक पोलीस आयुक्त भरत सूर्यवंशी यांच्यासह १५ पोलीस आणि दहा मनपा अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले. संतप्त झालेल्या जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांची अधिक कुमक मागविण्यात आली, पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यापैकी २० ते २५ जणांना ताब्यात घेऊन त्यांना पवई पोलीस ठाण्यात आणण्यात आले व संतप्त झालेल्या जमावाला सौम्य बळाचा वापर करून पांगविण्यात आले. दरम्यान महानगर पालिकेने या दगडफेकीच्या घटनेनंतर कारवाई तात्पुरती थांबविण्यात आली आहे.जखमी झालेल्या पोलीस आणि मनपा कर्मचारी यांना उपचारासाठी नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेप्रकरणी पवई पोलिसांनी २००हून अधिक जणांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली बेकायदेशीरपणे एकत्र येणे, दंगल, प्राणघातक हल्ला, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, सरकारी कर्मचारी यांना त्याचे कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त करणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच ताब्यात घेण्यात आलेल्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा