मुंबईतील नागपाडात मोठी दुर्घटना घडली आहे. पाण्याची टाकी साफ करण्यासाठी आत उतरलेल्या चार मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमध्ये ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
छोट्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये, टाक्या साफ करताना गुदमरून कामगारांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या वारंवार येत असतात, परंतु मुंबईसारख्या महानगरात अशा निष्काळजीपणामुळे पाच जणांचे जीव जाणे अत्यंत चिंताजनक आहे. आधुनिक सुरक्षा मानके आणि सर्व नियम आणि कायदे असूनही, जर पुरेशी खबरदारी न घेता कामगारांना टाकीत उतरवले गेले तर ते एक गंभीर प्रश्न निर्माण होतो.
हे ही वाचा :
उत्तर प्रदेश: हिंदुच्या नव्या चारचाकी गॅरेजच्या उद्घाटनावेळी मशिदीवरून दगडफेक!
कर्नाटका : हंपी अत्याचार प्रकरणी दोघांना अटक, तिसऱ्याचा शोध सुरु!
सीरियन सैन्य आणि असद समर्थकांमध्ये संघर्ष, दोन दिवसात एक हजार लोकांचा मृत्यू!
राजस्थानमध्ये ४५ कुटुंबांची घरवापसी!
रविवारी (९ मार्च) सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास बिस्मिल्लाह स्पेस या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील टाकीमध्ये साफसफाईसाठी चार कंत्राटी कामगार उतरले होते. मात्र, सफाई दरम्यान कामगारांचा जीव गुदमरला आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागले. यानंतर ते बेशुद्ध पडले. घटनेनंतर, घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतरांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर त्यांना तातडीनं अग्निशमन दलाच्या मदतीनं मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. दरम्यान अद्याप या मजुरांची ओळख पटू शकलेली नाहीये.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी पोलिसांसह सध्या घटनास्थळी उपस्थित आहेत. पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू केली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.