20 C
Mumbai
Monday, January 24, 2022
घरक्राईमनामा६० वर्षाच्या प्रियकराने आपल्या मुलाचेच केले अपहरण...

६० वर्षाच्या प्रियकराने आपल्या मुलाचेच केले अपहरण…

Related

६० वर्षाच्या प्रियकराकडून २७ वर्षाच्या प्रेयसीला झालेल्या मुलाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील नागपाडा परिसरात समोर आली. पोलिसांनी वेळ न दवडता तांत्रिक पद्धतीने अपहरणकर्त्याचा शोध घेऊन त्याला दिल्लीतून अटक करून मुलाची सुखरूप सुटका केली आहे.

दक्षिण मुंबईतील नागपाडा फारस रोड या ठिकाणी राहणारी २७ वर्षाची महिला त्याच परिसरातील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून नोकरी करीत आहे. २०२० मध्ये तिची ओळख तस्लिम खान (६०) याच्यासोबत झाली. तस्लिम हा मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. दोघांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. तस्लिम हा या महिलेच्या घरी येत जात होता. तस्लिम याच्याकडून या महिलेला सात महिन्यापूर्वी एक मुलगा झाला. मुलाचा सांभाळ करण्यासाठी या महिलेने गावाहून भाऊ आणि भावजयीला आणले होते.

१६ नोव्हेंबर रोजी तस्लिम हा प्रेयसी घरी नसताना आला व त्याने प्रेयसीच्या भावजयीकडून मुलाला फिरवून आणतो असे सांगून घेऊन गेला. रात्री उशिरापर्यंत तस्लिम हा मुलाला घेऊन न आल्यामुळे भावजयीने मुलाच्या आईला बोलावून घेतले. कामावरून घरी आलेल्या महिलेने तस्लिम याच्या मोबाईलवर संपर्क साधला मात्र त्याचा फोन लागत नसल्यामुळे घाबरलेल्या महिलेने नागपाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तस्लिम खान याचा शोध सुरू केला. तस्लिम यांच्या मोबाईल फोनवरून त्याचा शोध घेतला असता तब्बल १५ दिवसांनी तस्लिम हा उत्तरप्रदेश मुजफ्फर नगर या ठिकाणी असल्याचे कळताच पोलीस पथक उत्तरप्रदेश येथे रवाना झाले. मात्र तस्लिम हा तेथून ही निघून गेल्याचे कळताच पोलिसांनी त्याचे लोकेशन शोधले असता तो दिल्ली येथे असल्याची माहिती मिळाली.

हे ही वाचा:

‘पवार कुटुंब ओबीसी आरक्षणाचे कर्दनकाळ आहेत’

‘वरळी सिलेंडर स्फोट प्रकरणी शरम असल्यास आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा’

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांचे निधन

क्रिकेटमुळे ‘विमान’ हवेत!

 

पोलिसांनी तात्काळ दिल्ली रेल्वे स्थानक गाठून तस्लिम खान याला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील सात महिन्याच्या बाळाची सुखरूप सुटका केली. तस्लिम याला अपहरण प्रकरणी अटक करून मुंबईत आणण्यात आले असून न्यायालयाच्या आदेशावरून मुलाचा ताबा मुलाच्या आईकडे देण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,588अनुयायीअनुकरण करा
5,780सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा