28.9 C
Mumbai
Friday, July 10, 2026
घरक्राईमनामाकुर्ल्यात झाड अंगावर कोसळून ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

कुर्ल्यात झाड अंगावर कोसळून ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

पावसाळ्यातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Google News Follow

Related

मुंबई: कुर्ला (पश्चिम) परिसरात रविवारी दुपारी एका दुर्दैवी घटनेत झाड अंगावर कोसळून ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युनुस कुंडावाला असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवार, ५ जुलै २०२६ रोजी दुपारी १२:४० च्या सुमारास कुर्ला (पश्चिम) येथील नौपाडा भागात, हिंदी बीएमसी शाळेजवळ, गोम्स गाउन बिल्डिंगच्या परिसरात हे दुर्देवी कृत्य घडले. भरदुपारी अचानक एक जुने झाड कोसळले. हे झाड थेट एका दुकानावर कोसळले, ज्यामध्ये युनुस कुंडावाला गंभीर जखमी झाले.
​उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली.
हे ही वाचा:
बाबर आजम पुन्हा पाकिस्तानचा कसोटी कर्णधार!

ट्रम्प म्हणाले, खामेनींंच्या अंत्यदर्शनाला आलेल्या नेत्यांना लक्ष्य केले असते, पण…

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून लाखो उकळणारा गजाआड

इन्स्टाग्रामवरील बाल लैंगिक शोषण संबंधित जाहिरातींबाबत मेटाला नोटीस
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत जखमी युनुस यांना उपचारासाठी जवळच्या फौजिया रुग्णालयात हलवले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
​प्रशासनाची धावपळ
घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, बेस्ट आणि संबंधित वॉर्ड प्रशासनाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य राबवून कोसळलेले झाड हटवण्यात आले आणि परिसरातील सुरक्षितता सुनिश्चित करण्यात आली.
​मुंबईत पावसाळ्याच्या दिवसात जुनी झाडे पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटनेमुळे पालिकेच्या वृक्ष छाटणीच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा