शुक्रवारी सकाळी वांद्रे (पूर्व) येथील पश्चिम द्रुतगती मार्गावर एक भीषण अपघात घडला. एका भरधाव कारने दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेहून येणाऱ्या मोटारसायकलला धडक दिली. या भीषण अपघात दोन तरुणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी खेरवाडी पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
गुन्हेगारांच्या उपस्थितीत पोलिस अंमलदाराचा जंगी ‘हॅप्पी बर्थडे
हरियाणात सराव उड्डाणादरम्यान हवाई दलाचे विमान कोसळले!
नवभारत टाइम्सचे वरिष्ठ पत्रकार अभिमन्यू शितोळे यांचे निधन
ट्रम्प समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेली जपानची जनता त्यांच्या विजायानंतर शांत का झाली?
मानव पटेल (२१) आणि हर्ष मखवाना (२१) असे अपघात ठार झालेल्या तरुणांची नावे आहे. पोलिसांनी कार चालक सिद्धेश बेलकर (२३) याला अटक केली आहे. सिद्धेश हा तीन मित्रांसह कारने रात्रीच्या वेळी बोरिवली येथून वांद्रे येथे निघाला होता,आणि अपघातात ठार झालेले मानव आणि हर्ष हे दोघे वांद्रे रिक्लेमेशन येथून वांद्रेकडे मोटारसायकल वरून जात होते.
वांद्रेच्या दिशेने निघालेल्या सिद्धेश याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेहून येणाऱ्या हर्ष आणि मानवच्या मोटारसायकलला धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात मोटारसायकल
वरील दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर कार मध्ये असलेल्या तिघेजण किरकोळ जखमी झाले आहे.या प्रकरणी खेरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करून जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारचालक सिद्धेश बेलकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.