31 C
Mumbai
Thursday, September 17, 2026
घरक्राईमनामाविक्रोळीत केळीविक्रेत्या महिलेच्या हत्येचा छडा; फजलू रहमानला अटक

विक्रोळीत केळीविक्रेत्या महिलेच्या हत्येचा छडा; फजलू रहमानला अटक

महिलेचा कुजलेला मृतदेह सापडला होता

Google News Follow

Related

विक्रोळीतील कन्नमवार नगर परिसरात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याच्या धक्कादायक घटनेचा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला आहे. सुनीता मोरे (३२) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून, याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी फजलु रहेमान कुरेशी या संशयिताला रविवारी बेड्या ठोकल्या. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

कन्नमवार नगर परिसरात शनिवारी एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असता, महिलेची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान मृत महिलेची ओळख सुनीता मोरे म्हणून पटली. ती याच परिसरात केळी विक्रीचा व्यवसाय करत होती.

हे ही वाचा:

भारताविरुद्ध मालिकेसाठी बांगलादेश उत्सुक

‘कॉक्रोच’च्या मोर्चाविरोधात आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

युद्धाच्या सावटात मोदी-पेझेश्कियन भेट; द्विपक्षीय संबंधांचा आढावा

दुर्घटनेनंतर चीन – नेपाळ यांच्यात ‘तू तू मैं मैं’

या गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे फजलु कुरेशीला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता मोरे या शनिवारी नेहमीप्रमाणे केळी विक्रीसाठी जात असताना फजलुने त्यांना अडवले. त्याने त्यांना मासळी बाजारातील एका बंद दुकानात जबरदस्तीने ओढून नेले व गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला. सुनीता यांनी आरडाओरडा करून प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच, फजलुने त्यांची हत्या केली आणि घटनास्थळावरून पळ काढला.

दरम्यान, आरोपी आणि मृत महिला यांच्यात आधीपासून काही प्रेमसंबंध होते का, अथवा या हत्येमागे इतर काही कारण आहे का, या दिशेने विक्रोळी पोलीस अधिक तपास करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा