25 C
Mumbai
Thursday, October 10, 2024
घरक्राईमनामामलायका अरोराच्या वडिलांनी इमारतीवरून उडी मारून केली आत्महत्या; कोण होते अनिल अरोरा?

मलायका अरोराच्या वडिलांनी इमारतीवरून उडी मारून केली आत्महत्या; कोण होते अनिल अरोरा?

आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट

Google News Follow

Related

अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी बुधवारी अलमेडा पार्क या इमारतीच्या ६ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. त्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अनिल अरोरा हे पंजाबी हिंदू होते. भारतीय सीमेवरील फाजिल्काचे ते मूळचे रहिवासी. मर्चंट नेव्हीमध्ये ते कार्यरत होते. जॉयस पॉलीकार्प यांच्याशी ते विवाहबद्ध झाले. त्या मल्याळी ख्रिश्चन होत्या. त्यांना मलायका आणि अमृता या दोन मुली आहेत. मलायका आणि अमृता या ११ आणि ६ वर्षांच्या असताना अनिल अरोरा यांचा घटस्फोट झाला.

हे ही वाचा:

जगप्रसिद्ध चित्रकार एस.एच. रझा यांच्या कोट्यवधीच्या पेंटिंगची चोरी

शिमल्यात अवैध मशिदीविरोधात हिंदूंचा संताप, उग्र आंदोलन !

पॅरिस पॅरालिम्पिक पदक विजेत्यांवर बक्षिसांचा पाऊस!

१६ वर्षांखालील मुलांना ऑस्ट्रेलियात ‘सोशल मीडियाबंदी’

मलायकाने या घटस्फोटाबद्दल एका मुलाखतीत स्पष्टीकरण दिले होते. या घटस्फोटामुळे आपण आपल्या आईला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकले असे मलायका म्हणाली होती. ती म्हणाली होती की, माझे बालपण छान होते पण आव्हानात्मकही होते. पण कठीण काळ आपल्याला खूप काही शिकवून जातो.

२०२३मध्ये अनिल अरोरा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २०२२मध्ये मलायकाने आपल्या दोन्ही पालकांसह ख्रिसमस साजरा केला होता. मलायका अरोराचा विवाह सलमान खानचा भाऊ अरबाझ खानशी झाला होता. नंतर त्यांचा घटस्फोट झाला. अमृता अरोराचा विवाह शकील लडाकशी झालेला आहे.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
181,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा