नव्याने दाखल झालेल्या अग्निवीराचा अपघाताने स्वतःच्याच बंदुकीतून निघालेल्या गोळीमुळे मृत्यू झाल्याची घटना जम्मू आणि काश्मीरमध्ये घडली, असे लष्करातर्फे सांगण्यात आले.
जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात ही घटना घडल्याचे लष्कराने शनिवारी सांगितले. अमृतपाल सिंग (१९) असे या अग्निवीराचे नाव आहे.
बुधवारी, ११ ऑक्टोबर रोजी सैनिकाचे कर्तव्य बजावत असताना हा अपघात झाला. त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेला भारतीय लष्कराने दुजोरा दिला आहे. “राजौरी सेक्टर येथे सैनिकाचे कर्तव्य बजावत असताना झालेल्या दुर्दैवी घटनेत अग्निवीर अमृतपाल सिंग यांचा बंदुकीच्या गोळीमुळे झालेल्या दुखापतीमुळे मृत्यू झाला,’ असे भारतीय लष्करातर्फे सांगण्यात आले. या विचित्र अपघाताची चौकशी करण्यासाठी ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’ सुरू करण्यात आली आहे, अशीही माहिती लष्कराने दिली.
हे ही वाचा:
भारतापुढे पाकिस्तानची दाणादाण, भारताचा आठवा वर्ल्डकप विजय
प्रशांत किशोर यांनी दिले नीतिश कुमारांना आव्हान
इस्रायलने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये हमासच्या एरियल फोर्सचा प्रमुख ठार
बोगस पासपोर्ट प्रकरणी सीबीआयचे ५० ठिकाणी छापे
“मृताचे पार्थिव अवशेष अग्निवीरच्या युनिटने भाड्याने घेतलेल्या सिव्हिल रुग्णवाहिकेतून एक कनिष्ठ आयुक्त अधिकारी आणि इतर चार रँकसह नेण्यात आले. सोबत असलेले लष्कराचे जवानही अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते. स्वत:च्याच बंदुकीतून निसटलेल्या गोळीमुळे हा अपघात झाला आणि त्यात झालेल्या गंभीर दुखापतीत त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे विद्यमान धोरणानुसार त्याला ‘गार्ड ऑफ ऑनर’ किंवा लष्करी अंत्यसंस्कार प्रदान केले गेले नाहीत, असेही लष्कराने निवेदनात स्पष्ट केले आहे.