25 C
Mumbai
Saturday, December 7, 2024
घरक्राईमनामाआसाम पोलिसांनी १४ बांगलादेशी पकडले, ९ जणांकडे मिळाले आधारकार्ड!

आसाम पोलिसांनी १४ बांगलादेशी पकडले, ९ जणांकडे मिळाले आधारकार्ड!

मुख्यमंत्री सरमा यांच्याकडून राज्य पोलीस दलाचे कौतक

Google News Follow

Related

बांगलादेशात सत्तापालटानंतर भारतात घुसखोरीच्या अनेक घटना समोर येत आहेत. भारतीय सीमा सुरक्षा दल आणि राज्य पोलीस अशा घुसखोरांवर नजर ठेवून आहेत. तरीही बांगलादेशी नागरिक अवैद्यरित्या भारतात शिरकाव करून भारतात राहत असल्याचे समोर येत आहे. अशाच घुसखोरी करणाऱ्या १४ बांगलादेशी नागरिकांना आसाम पोलिसांनी पकडले आहे. विशेष म्हणजे, यातील ९ जणांकडे आधारकार्ड देखील सापडले आहेत.

आसामचे मुख्यमंत्री हिम्मत बिस्वा सरमा यांनी बुधवारी (२ ऑक्टोबर) या घटनेची माहिती दिली. मुख्यमंत्री सरमा यांनी ट्वीटकरत म्हटले, राज्यात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी १४ बांगलादेशींना अटक करण्यात आली  असून त्यापैकी नऊ जणांकडे आधार कार्डही आहेत.

मोहम्मद अरिफुल इस्लाम, मोहम्मद मोनीर हुसेन, मोफजल हुसेन, मोहम्मद मिझानुर रहमान, अबीदुल्ला हसन, अश्रफुल इस्लाम, माणिक मियाँ, नोबी हुसेन, वलीउल उल्लाह, हजरत अली, सफीकुल इस्लाम, जमीन फुरकान अली, मोमिनुल हक,मोहम्मद अन्वर हुसेन, अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

हे ही वाचा : 

केकमधून कॅन्सर?? बेंगळुरुत केकच्या १२ नमुन्यात सापडले घटक!

सावरकरांबाबत काँग्रेसची वाह्यात बडबड सुरूच!

मनी लाँड्रिंग प्रकरणी माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनला ईडीचे समन्स!

नसरल्ला समर्थकांनो… कॅण्डल मार्च काढून काय होणारे त्यापेक्षा बांधवांसोबत जाऊन लढा

या प्रकरणी मुख्यमंत्री सरमा यांनी राज्य पोलीस दलाचे कौतुक केले आणि म्हणाले,  बांगलादेशात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यापासून आम्ही कडक नजर ठेवली आहे आणि या काळात १०८ अवैध घुसखोरांना पकडले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
209,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा